चपाती (Chapati) हे भारतीय थाळीतील मुख्य पदार्थ. भारतातील अनेक भागात चपाती केली जाते. काही ठिकाणी चपातीला रोटी, पोळ्या किंवा फुलके म्हणतात. चपाती मऊ लुसलुशीत खाण्यातच मज्जा आहे. पण पीठ नीट मळले गेले तरच चपात्या परफेक्ट तयार होतात. मात्र, अनेकदा कणिक उरते.
अशा वेळी कणिक कुठे स्टोर करून ठेवावे हा प्रश्न निर्माण होतो. बऱ्याच महिला मळलेली कणिक फ्रिजमध्ये स्टोर करून ठेवतात. पण काही वेळानंतर कणिक काळपट पडते. मळलेली कणिक अधिक काळ फ्रेश राहावी असे वाटत असेल तर, ३ टिप्स फॉलो करून पाहा. या टिप्समुळे कणिक अधिक काळ फ्रेश राहील(Quick Tips To Keep Atta Dough Fresh For Long).
मळलेली कणिक स्टोर करताना फॉलो करा या ३ टिप्स
- बऱ्याच महिला कणिक फ्रिजमध्ये स्टोर करतात. पण कणिक फ्रिजमध्ये स्टोर केल्याने कडक होते, किंवा काळपट पडते. अशा वेळी कणिक स्टोर करताना कणकेवर तेल किंवा तूप लावून ग्रीस करा, व त्यानंतर एअर टाईट डब्यात साठवून ठेवा. यामुळे कणिक लवकर कडक किंवा काळपट पडणार नाही.
कपभर गव्हाचे पीठ आणि गूळ, करा पारंपरिक गोड कडाकण्या, अष्टमीला खास नैवेद्य
- जर मळलेली कणिक फ्रिजमध्ये स्टोर करून ठेवत असाल तर, कणकेला आधी अॅल्युमिनियम फॉइल पेपरमध्ये व्यवस्थित गुंडाळा. त्यानंतर एअर टाईट डब्यात स्टोर करून फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे कणिक लवकर कडक किंवा काळपट पडणार नाही.
- कणिक स्टोर करून ठेवण्यासाठी आपण झिप बॅगचा देखील वापर करू शकता. यासाठी झिप बॅगमध्ये आधी अर्धा चमचा तेल लावून ग्रीस करा. नंतर त्यात कणकेचा गोळा ठेऊन झिप बॅग बंद करा, व ही झिप बॅग फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे कणिक लवकर काळपट पडणार नाही.