Join us  

दिवाळीत पाहूणे घरी आले तर १० मिनिटांत करा मसाला पुलाव; सोपी रेसिपी-आवडीने खातील सगळे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 1:33 PM

Quick Veg Masala Pulao Recipe : (Masala Pulao Karnyachi Recipe) : मसाला पुलाव बनवण्यासाठी फार साहित्य लागणार नाही. कमीत कमी वेळात हा पदार्थ बनून तयार होईल.

सणासुदीला रोजचं वरण भात, चपाती भाजी न खाता काहीतरी नवीन खाण्याची इच्छा होते पण जास्तवेळ नसल्यामुळे  लोक बाहेरून विकत आणून खातात आणि घरी काहीही बनवणं टाळतात. (Masala Pulao Kasa Karaycha) घरच्याघरी रात्रीच्या किंवा  दुपारच्या जेवणसाठी तुम्ही अगदी कमीत कमी वेळात पुलाव बनवू शकता.  मसाला पुलाव बनवण्यासाठी फार साहित्य लागणार नाही. कमीत कमी वेळात हा पदार्थ बनून तयार होईल. कुकरमध्ये १० मिनिटांत व्हेज मसाला पुलाव कसा करायचा ते पाहूया. (How to Make Masala Pulav)

कुकरमध्ये पुलाव कसा करावा? 

1) दीड कप बासमती तांदूळ घ्या.  तांदूळ २ ते ३ वेळा धुवून घ्या तुम्ही रोजच्या वापरातले तांदूळही घेऊ शकता. तांदूळ धूवून पाणी काढून झाल्यानंतर २० मिनिटांसाठी भिजवायला ठेवा,

२) कुकरमध्ये २ मोठे चमचे साजूक तूप आणि २ मोठे चमचे तेल घाला. या कॉम्बिनेशनमुळे तुपाचा चव चांगली येते. तुपात खडा मसाला परतवून घ्या. नंतर यात लांब चिरलेला कांदा परतवून घ्या. कांदा लाससर-गोल्डन झाल्यानंतर त्यात १ लहान चमचा आलं-लसणाची पेस्ट घाला. तुम्ही लसूण खात नसाल तर फक्त आल्याची पेस्ट घाला. मग त्यात ४ चे ५ पाच लांब चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला. 

१ वाटी ज्वारीच्या पीठाच्या करा खमंग-काटेरी चकल्या; कमी साहित्यात-झटपट बनेल परफेक्ट चकली

३) नंतर २ मध्यम आकाराचे लांब चिरलेले टोमॅटो घाला. टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्या. नंतर चिरलेला बटाटा घाला. तुम्ही यात आवडीनुसार भाज्या घालू शकता.  वाटाणे, गाजराचे काप घालू शकता. भाज्या जास्त शिजवू नका नाहीतर  टेस्ट चांगली लागणार नाही.  ४ ते ५ मिनिटं भाज्या परतवल्यानंतर त्यात अर्धा कप फेटलेलं  दही घाला. 

४) दही घालून सर्व भाज्या पुन्हा परतवून घ्या.  मग १ चमचा हळद, चवीनुसार मीठ दीड चमचा लाल तिखट, १ चमचा धणे पावडर घाला. तुम्ही यात पावभाजी मसाला किंवा बिर्याणी मसाला घालू शकता. नंतर त्यात तांदूळ घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्या. यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. 

१ वाटी डाळ-तांदूळाचा करा विकतसारखा जाळीदार ढोकळा; जीभेवर ठेवताच विरघळेल-सोपी रेसिपी

५) तांदळाच्या प्रमाणापेक्षा दुप्पट पाणी घाला कुकरमध्ये शिजवताना अर्धा कप पाणी कमी घाला. यात २ ते ३ चमचे लिंबाचा रस घाला जेणेकरून तांदूळ मोकळे शिजतील. नंतर सर्व साहित्य एकत्र करून  झाकण लावा आणि २ शिट्ट्या घ्या. कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर झाकण काढून पुलाव सर्व्ह करा. रायता किंवा लोणच्याबरोबर तुम्ही मसाला पुलाव खाऊ शकता. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्नदिवाळी 2023पाककृती