Join us  

कपभर पांढरे वाटाणे-२ बटाटे, चटपटीत रगडा करण्याची सोपी कृती, १५ मिनिटात डिश रेडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2023 12:59 PM

Ragda recipe for pani puri, Easy recipe for chaat lovers : पाणी पुरीसोबत मिळतो तसा रगडा घरी तयार करायचाय? ही रेसिपी फॉलो करून पाहाच

आंबट - गोड चवीची पाणी पुरी प्रत्येकाला आवडते. टम्म फुगलेल्या पुरीमध्ये आंबट - गोड चवीचं पाणी, त्यात रगडा यासह शेव, हे कॉम्बिनेशन अप्रतिम लागते. तोंडात टाकताच, पुरी फुटली, की त्यातून रगडा व तिखट - गोड पाण्याची एकत्रित चव जिभेचे चोचले पुरवते. एक प्लेट खाल्ल्यानंतर अनेकांना पाणी पुरी सतत खावीशी वाटते. फक्त पाणी पुरीच नाहीतर, रगडा पुरी, शेव पुरी, पापडी चाट, या पदार्थांमध्ये रगडाचा वापर होतो.

रगडा व्यवस्थित तयार झाला की, हे चाट पदार्थ चवीला आणखी भन्नाट लागतात. पण घरात तयार केल्यास, रगडा पाणी पुरीच्या ठेल्यावर मिळतो, तसा तयार होत नाही. जर आपल्याला रगडा घरी तयार करायचा असेल तर, ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहा. ही रेसिपी फॉलो केल्याने रगडा परफेक्ट तयार होईल, ज्यामुळे इतरही चाटची रंगत एकट्या रगड्यामुळे वाढेल(Ragda recipe for pani puri, Easy recipe for chaat lovers).

रगडा करण्यासाठी लागणारं साहित्य

पांढरे वाटाणे

बटाटे

मीठ

पाणी

मटकीची उसळ नेहमीचीच, करून पाहा वाटीभर मटकीची कुरकुरीत भजी, चवीला भारी-करायला सोपी

हिंग

लसूण

हिरवी मिरची

कांदा

टोमॅटो

लाल तिखट

हळद

कसुरी मेथी

धणे पूड

आमचूर पावडर

कोथिंबीर

तेल

कृती

सर्वप्रथम, एक कप पांढरे वाटाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी कुकरच्या भांड्यात भिजलेले पांढरे वाटाणे, २ बटाटे, चवीनुसार मीठ व एक कप पाणी घालून प्रेशर कुकरचं झाकण लावून कुकर गॅसवर ठेवा. मध्यम आचेवर २ शिट्टी आल्यानंतर गॅस बंद करा. एका कढईत २ चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर एक चमचा जिरं, चिमुटभर हिंग, बारीक चिरलेला लसूण, आलं आणि हिरवी मिरची घालून साहित्य भाजून घ्या.

बटाटे लवकर शिजत नाही, कुठे अर्धे कच्चे, तर कुठे फुटतात? एक ट्रिक, ५ मिनिटात बटाटे शिजवण्याची नवी ट्रिक

नंतर त्यात एक बारीक चिरलेला कांदा घाला, व लालसर होईपर्यंत सर्व साहित्य भाजून घ्या. कांदा भाजून झाल्यानंतर त्यात एक बारीक चिरलेला टोमॅटो घाला. नंतर त्यात एक चमचा लाल तिखट, चिमुटभर हळद, एक चमचा कसुरी मेथी, एक चमचा धणे पूड व आमचूर पावडर घालून साहित्य एकजीव करा.

प्रेशर कुकर थंड झाल्यानंतर त्यातून पांढरे वाटाणे आणि बटाटे एका प्लेटमध्ये काढून घ्या. नंतर मॅशरने साहित्य मॅश करून घ्या. मॅश केलेले वाटाणे आणि बटाटे फोडणीत घालून मिक्स करा. २ मिनिटे त्यावर झाकण ठेऊन रगडा शिजवून घ्या. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरून तयार रगडा एका बाऊलमध्ये काढून घ्या. अशा प्रकारे चटपटीत रगडा रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.