Lokmat Sakhi >Food > हाडं कमजोर - अंगात रक्त कमी? रोज खा ‘हा’ १ पौष्टीक लाडू; कॅल्शियमही भरपूर

हाडं कमजोर - अंगात रक्त कमी? रोज खा ‘हा’ १ पौष्टीक लाडू; कॅल्शियमही भरपूर

Ragi Laddu - Protein-Iron Rich & Healthy Laddu | No Sugar/oil | Finger millet Ladoo : थोडं पौष्टिक आणि झटपट खाण्याचा हा सोपा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2024 01:59 PM2024-07-19T13:59:16+5:302024-07-19T14:00:26+5:30

Ragi Laddu - Protein-Iron Rich & Healthy Laddu | No Sugar/oil | Finger millet Ladoo : थोडं पौष्टिक आणि झटपट खाण्याचा हा सोपा पर्याय

Ragi Laddu - Protein-Iron Rich & Healthy Laddu | No Sugar/oil | Finger millet Ladoo | हाडं कमजोर - अंगात रक्त कमी? रोज खा ‘हा’ १ पौष्टीक लाडू; कॅल्शियमही भरपूर

हाडं कमजोर - अंगात रक्त कमी? रोज खा ‘हा’ १ पौष्टीक लाडू; कॅल्शियमही भरपूर

नाचणी खाण्याचे अनेक फायदे आहेत (Ragi Ladoo). यात कॅल्शियम व्यतिरिक्त, प्रोटीन, फायबर, खनिजे देखील असतात त्यामुळे नाचणी गहू किंवा तांदूळपेक्षा जास्त पौष्टिक असतात (Food). तसेच नाचणी खाल्ल्याने खराब कोलेस्टेरॉल, रक्तातील साखरेची पातळी कमी आणि वेट लॉससाठी मदत होते (Cooking tips). नाचणी खाल्ल्याने शरीराला भरपूर प्रमाणात लोह मिळते.

अॅनिमियाच्या रुग्णांनी आपल्या आहारात नाचणीचा अवश्य समावेश करावा. आपण नाचणीची भाकरी खाल्ली असेल, पण कधी नाचणीचे लाडू करून पाहिले आहे का? नाचणीचे पौष्टीक लाडू कमी साहित्यात झटपट तयार होतात. जर नाचणीची भाकरी खायची नसेल तर नाचणीचे पौष्टीक लाडू तयार करून खा(Ragi Laddu - Protein-Iron Rich & Healthy Laddu | No Sugar/oil | Finger millet Ladoo).

नाचणीचे लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य

नाचणीचं पीठ

बदाम

गुळ पावडर

नाश्त्याला करा २ बटाट्याचे कुरकुरीत मेदू वडे; इन्स्टंट रेसिपी; अगदी १० मिनिटात क्रिस्पी डिश रेडी

पांढरे तीळ

साजूक तूप

कृती

सर्वात आधी कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात एक चमचा तूप घाला. तूप विरघळल्यानंतर त्यात एक कप नाचणीचं पीठ घालून भाजून घ्या. नाचणीचं पीठ भाजून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या. त्यात एक कप बदाम घाला आणि भाजून घ्या. भाजलेले बदाम मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. त्यात एक कप किसलेला गुळ किंवा गुळ पावडर, वेलची पूड घालून पावडर तयार करा.

कोणता ब्रेड खाणं तब्येतीसाठी योग्य? व्हाइट की ब्राऊन? कोणता लवकर पचतो, कशाने वाढतं वजन?

तयार पावडर भाजलेल्या नाचणीच्या पिठात घालून मिक्स करा. नंतर त्यात एक चमचा पांढरे तीळ आणि एक कप साजूक तूप घालून मिक्स करा, व लाडू वळवून घ्या. अशा प्रकारे नाचणीचे पौष्टीक लाडू खाण्यासाठी रेडी. आपण रोज एक लाडू खाऊ शकता. याने शरीराला अनेक पौष्टीक घटक मिळतील.

Web Title: Ragi Laddu - Protein-Iron Rich & Healthy Laddu | No Sugar/oil | Finger millet Ladoo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.