Lokmat Sakhi >Food > नाचणी-ओट्सचा ढोकळा, करा झटपट आणि कॅल्शियमही भरपूर-खा पोटभर; वजनही होईल कमी....

नाचणी-ओट्सचा ढोकळा, करा झटपट आणि कॅल्शियमही भरपूर-खा पोटभर; वजनही होईल कमी....

Ragi Oats Dhokla : Ragi Oats Dhokla Recipe : Healthy Breakfast Ragi Oats Dhokla : Easy, Instant, Healthy Weight Loss Dhokla Recipe : नाचणीची भाकरी, आंबील असे पदार्थ आपण खातोच, परंतु आता ट्राय करा नाचणीच्या पिठाचा मस्त गरमागरम ढोकळा, चव अशी की...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2025 16:13 IST2025-02-27T15:46:24+5:302025-02-27T16:13:36+5:30

Ragi Oats Dhokla : Ragi Oats Dhokla Recipe : Healthy Breakfast Ragi Oats Dhokla : Easy, Instant, Healthy Weight Loss Dhokla Recipe : नाचणीची भाकरी, आंबील असे पदार्थ आपण खातोच, परंतु आता ट्राय करा नाचणीच्या पिठाचा मस्त गरमागरम ढोकळा, चव अशी की...

Ragi Oats Dhokla Easy, Instant, Healthy Weight Loss Dhokla Recipe Healthy Breakfast Ragi Oats Dhokla | नाचणी-ओट्सचा ढोकळा, करा झटपट आणि कॅल्शियमही भरपूर-खा पोटभर; वजनही होईल कमी....

नाचणी-ओट्सचा ढोकळा, करा झटपट आणि कॅल्शियमही भरपूर-खा पोटभर; वजनही होईल कमी....

निरोगी राहण्यासाठी आहारात पौष्टीक पदार्थांचा समावेश करणं अत्यंत गरजेचं असत. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण यासोबतच रात्रीच्या जेवणात देखील वेगवेगळ्या प्रकारचे पौष्टिक पदार्थ असायला हवेत. सकाळचा नाश्ता हेल्दी पदार्थांनी केल्याने दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. नाश्त्याला आपण पोहे, उपमा, साऊथ इंडियन पदार्थ यासह ढोकळा (Ragi Oats Dhokla) आवडीने खातो. परंतु आपल्यापैकी काही लोक जे आपले डाएट अगदी काटेकोरपणे पाळतात, किंवा काहीजण (Healthy Breakfast Ragi Oats Dhokla)  वजन कमी करण्यासाठी शक्यतो हेल्दी पदार्थच खातात. 

सकाळच्या हेल्दी नाश्त्यात आपण ओट्स, दलिया, फ्रुट सॅलॅड असे अनेक हेल्दी पदार्थ खातो. परंतु रोज तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो अशावेळी काहीतरी चटपटीत (Ragi Oats Dhokla Recipe) पण हेल्दी खावेसे वाटते. नाश्त्याला आपण ओट्स आणि नाचणीच्या पिठापासून तयार केलेला हेल्दी चटपटीत ढोकळा (Easy, Instant, Healthy Weight Loss Dhokla Recipe) खाऊ शकतो. आपण नेहमीच पिवळाधम्मक ढोकळा खातो. हा ढोकळा बेसन पिठाचा वापर करुन तयार केला जातो त्यामुळे तो फारसा हेल्दी नसतो. यासाठी जर का तुम्हाला काही हेल्दी खायचे असेल तर आपण नाचणी - ओटसचा सुपर हेल्दी ढोकळा तयार करुन खाऊ शकतो. पण कधी नाचणी - ओटसचा सुपर हेल्दी ढोकळा करुन पाहिला आहे का...  नाचणी - ओटसच्या पिठाचा हेल्दी ढोकळा कसा करायचा ते पहा...

साहित्य  :- 

१. नाचणीचे पीठ - १ कप 
२. ओटस पावडर - १/२ कप 
३. पांढऱ्या उडीद डाळीचे पीठ - १/२ कप 
४. दही - १/३ कप 
५. मीठ - चवीनुसार
६. जिरेपूड - १/२ टेबलस्पून 
७. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून 
८. आलं - हिरव्या मिरचीची पेस्ट - १ टेबलस्पून 
९. बेकिंग सोडा - १/२ टेबलस्पून 
१०. तेल - १ ते २ टेबलस्पून 
११. पाणी - गरजेनुसार 
१२. मोहरी - १ टेबलस्पून 
१३. पांढरे तीळ - १ टेबलस्पून 
१४. हिरव्या मिरच्या - ३ ते ४ 
१५. कडीपत्ता - ८ ते १० पानं 
१६. साखर - चवीनुसार

कडीपत्ता महिनाभर राहील ताजा, पाहा १ भन्नाट टिप - रंग - सुवास आणि चव टिकेल जास्त दिवस...


फक्त वाफेवर, इडली पात्रात करा साबुदाण्याचे कुरकुरीत पापड, पीठ शिजवणे - वाळवणे अशी झंझट विसरा!

कृती :- 

१. सगळ्यांत आधी एका मोठ्या बाऊलमध्ये नाचणीचे पीठ, ओटस पावडर, पांढऱ्या उडीद डाळीचे पीठ एकत्रित चाळून घ्यावे. 
२. त्यानंतर त्यात दही आणि चवीनुसार मीठ घालावे. मग चमच्याने हलवून सगळे जिन्नस कालवून घ्यावेत. 
३. आता या बॅटरमध्ये गरजेनुसार पाणी घालून बॅटर मध्यम कंन्सिस्टंन्सीचे तयार करून घ्यावे. 
४. त्यानंतर ६ ते ८ तास हे बॅटर झाकून फर्मेंटेशन होण्यासाठी ठेवून द्यावे. 
५. पीठ व्यवस्थित आंबवून घेतल्यानंतर ढोकळा करण्यापूर्वी यात जिरेपूड, लाल तिखट मसाला, आलं - हिरव्या मिरचीची पेस्ट, बेकिंग सोडा, तेल घालावे. 

६. सगळ्यांत शेवटी सगळे जिन्नस एकत्रित करून घ्यावेत. आता एका कडा असलेल्या मोठ्या पसरट डिशला थोडे तेल लावून ग्रीस करून घ्यावे. या ग्रीस केलेल्या डिशमध्ये हे ढोकळ्याचे तयार बॅटर ओतून घ्यावे. 
७. मग कुकरची शिट्टी काढून त्यात १० ते १२ मिनिटांसाठी हा ढोकळा ठेवून व्यवस्थित वाफवून घ्यावा. मग ढोकळा कुकरबाहेर काढून तो थोडा थंड होऊ द्यावा. 
८. एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात मोहरी, पांढरे तीळ, हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या, कडीपत्त्याची पाने, साखर घालून खमंग अशी फोडणी तयार करून घ्यावी. ही तयार फोडणी ढोकळ्यावर घालावी त्यानंतर सुरीच्या मदतीने या ढोकळ्यांचे चौकोनी तुकडे करून घ्यावेत. 

पौष्टिक आणि हेल्दी असा नाचणी ओट्सचा ढोकळा खाण्यासाठी तयार आहे. आपण हा ढोकळा हिरव्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करावा.

Web Title: Ragi Oats Dhokla Easy, Instant, Healthy Weight Loss Dhokla Recipe Healthy Breakfast Ragi Oats Dhokla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.