Lokmat Sakhi >Food > रायते पांचट पातळ होते? दाट आणि खमंग चवीचे रायते करण्याची रेसिपी

रायते पांचट पातळ होते? दाट आणि खमंग चवीचे रायते करण्याची रेसिपी

बुंदी रायते दाटसर आणि खमंग चवीचं होण्यासाठी तो योग्य पध्दतीने करायला हवा. दही आणि बुंदी घरची असली तर रायता चविष्ट होणारच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2022 08:21 PM2022-02-18T20:21:41+5:302022-02-21T13:20:56+5:30

बुंदी रायते दाटसर आणि खमंग चवीचं होण्यासाठी तो योग्य पध्दतीने करायला हवा. दही आणि बुंदी घरची असली तर रायता चविष्ट होणारच!

Raita gets thin? Recipe for thick and delicious raita | रायते पांचट पातळ होते? दाट आणि खमंग चवीचे रायते करण्याची रेसिपी

रायते पांचट पातळ होते? दाट आणि खमंग चवीचे रायते करण्याची रेसिपी

Highlightsबुंदी रायत्यासाठी विकतची बुंदी आणि ताक वापरल्यास ती पातळ आणि पांचट होते.दही घरी विरजलेलं आणि बुंदी ताजी असली तर रायते चविष्ट होते. 

बुंदी रायता ही जेवणातील साइड डिश म्हणून ओळखली जाते.  आतून गारवा देणारा, पोटाला शांत करणारा बुंदी रायता जेवणात असला की जेवणाला चव येते. पण बुंदी रायता नीट जमून यायला हवा. बहुतांशवेळा बुंदी रायता ताकात बुंदी घालून केला जातो. त्यामुळे तो पातळ होतो आणि पांचटही लागतो. बुंदी रायता चविष्ट  आणि दाटसर होण्यासाठी तो दह्यात करायला हवा. यासाठी घरचं दही वापरलं, घरीच ताजी बुंदी केली तर बुंदी रायता खमंग चवीचा लागतो.

Image: Google

बुंदी रायते  कसे करावे?

2 कप दही, 1 छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्यांची पूड, अर्धा चमचा लाल तिखट, तळणासाठी तेल, अर्धा चमचा साखर, अर्धा कप बेसन, चवीनुसार मीठ, 1 छोटा चमचा बेकिंग सोडा, गरजेनुसार पाणी घ्यावं.

Image: Google

बुंदी रायते करण्यासाठी  ताजी बुंदी करावी. त्यासाठी एका भांड्यात बेसन पीठ घ्यावं. त्यात जिरे आणि बेकिंग सोडा घालावा. पीठ चांगलं मिसळून घ्यावं.  यात हळूहळू पाणी घालावं घट्टसर मिश्रण तयार करावं.  कढईत तेल घ्यावं. ते गरम करावं. तळणाच झारा घेऊन त्यावर तयार केलेलं बेसनाचं मिश्रण घालून बारीक बुंदी पाडावी. मध्यम आचेवर बुंदी लालसर तळावी. बुंदी तळल्यावर लगेचंच कोमट पाण्यात घालावी. थोडा वेळ पाण्यात भिजू द्यावी. 

Image: Google

रायते करण्यासाठी एका भांड्यात दही फेटून घ्यावं. त्यात चवीनुसार मीठ, जिरे पावडर , लाल तिखट आणि थोडी साखर घालावी. हे मिश्रण चांगलं फेटून घ्यावं. पाण्यातून बुंदी पिळून घ्यावी. बुंदी फेटलेल्या दह्यात घालावी.ती दह्यात नीट कालवून घ्यावी. वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. हे  रायते पुलाव, मसालेभातसोबत छान लागतो तसेच नुसता खाल्ला तरी चवीचा आनंद मिळतो.

Web Title: Raita gets thin? Recipe for thick and delicious raita

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.