Lokmat Sakhi >Food > अहाहा... झणकेदार राजस्थानी भरवा मिर्च! स्वाद असा भारी की याद रखोगे..करून बघा रेसिपी..

अहाहा... झणकेदार राजस्थानी भरवा मिर्च! स्वाद असा भारी की याद रखोगे..करून बघा रेसिपी..

Rajasthani Recipe : जेवणात तोंडी लावायला काहीतरी चटकदार पाहिजे असतं ना, मग अशावेळी ही राजस्थानी स्टाईलची भरवा मिर्च (Bharva Mirchi, spicy stuff chilli ) करा... जेवणात येईल सॉलिड मजा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 02:26 PM2021-11-19T14:26:32+5:302021-11-19T14:36:29+5:30

Rajasthani Recipe : जेवणात तोंडी लावायला काहीतरी चटकदार पाहिजे असतं ना, मग अशावेळी ही राजस्थानी स्टाईलची भरवा मिर्च (Bharva Mirchi, spicy stuff chilli ) करा... जेवणात येईल सॉलिड मजा..

Rajasthani Food: Ahaha ... Rajasthani Bharwa Mirch! Try this recipe of spicy stuff chilli | अहाहा... झणकेदार राजस्थानी भरवा मिर्च! स्वाद असा भारी की याद रखोगे..करून बघा रेसिपी..

अहाहा... झणकेदार राजस्थानी भरवा मिर्च! स्वाद असा भारी की याद रखोगे..करून बघा रेसिपी..

Highlightsकोणत्याही पद्धतीचं जेवण असलं तरी ही मिरची तोंडी लावायला घेऊ शकता.

वरण- भात, भाजी- पोळी असा सगळा स्वयंपाक केलेला असला तरीही जेवणाच्या ताटात जोपर्यंत side dish म्हणजेच जेवताना तोंडी लावण्याचे पदार्थ येऊन बसत नाहीत, तोपर्यंत ताट पुर्ण सजल्यासारखे वाटत नाही. ताेंडी लावायला चटकमटक पदार्थ नसले तर जेवणाची मजाही कमी होते. मग तुम्ही केलेली भाजी किंवा वरण कितीही चवदार झालेले असले तरी ते अपूरेच वाटते. म्हणूनच तर आपल्याकडे जेवणाच्या ताटात कोशिंबीर, लोणचे, चटणी, ठेचा असे वेगवेगळे पदार्थ असतातच. 

 

प्रत्येक प्रांतात जेवताना तोंडी लावण्याच्या पदार्थांमध्ये थोडा- फार फरक दिसून येतो. काही पदार्थ पुर्णपणे वेगळेच असतात तर काही पदार्थ बनविण्याची रेसिपी किंवा पद्धती वेगवेगळी असते. असाच एक राजस्थानी स्टाईलचा आणि जेवताना खास तोंडी लावण्याचा पदार्थ म्हणजे भरवा मिर्च म्हणजेच आपल्या भाषेत सांगायचं झालं तर भरलेली मिरची. तुम्ही कोणताही स्वयंपाक केला असला, तरी ही मिरची थोडीशी ताटात वाढून घ्या आणि जेवताना प्रत्येक घासासोबत तोंडी लावा. मग बघा तुमच्या साध्या जेवणालाही कसा चटपटीत आणि झणझणीत तडका मिळतो ते... ही रेसिपी इन्स्टाग्रामच्या the_temptetionally या पेजवर शेअर करण्यात आली आहे. 

 

राजस्थानी भरवा मिर्च करण्यासाठी लागणारं साहित्य
मोठ्या आकाराच्या जाडसर आणि कमी तिखट मिरच्या (जर तुम्हाला खूप तिखट खायला आवडत असेल तर तुम्ही तिखट मिरचीही या रेसिपीसाठी वापरू शकता.), तेल, बेसन पीठ, तिखट, मीठ, जिरे, धने पूड.

घरीच बनवा ढाबा स्टाईल पनीर कढाई! चव अशी जमेल परफेक्ट, खाओ जी भर के..

कशी करायची राजस्थानी भरवा मिर्च?
Rajasthani Bharva Mirch Recipe

- राजस्थानी भरवा मिर्च करण्यासाठी सगळ्यात आधी मिरच्या स्वच्छ धुवून घ्या.
- प्रत्येक मिरचीवर उभा छेद करा आणि मिरची न तुटू देता तिच्या आतल्या सगळ्या बिया काढून टाका.
- यानंतर एका कढईत थोडं तेल टाका.
- तेल गरम झाल्यानंतर त्यात थोडे जिरे टाका. जीरे तडतडल्यानंतर त्यात थोडी हळद टाका.
- यानंतर यामध्ये ३ ते ४ चमचे बेसन पीठ टाका.


- पीठ चांगलं परतून घ्या. कारण कच्चं राहिलं तर त्रास होऊ शकतो.
- पीठ परतून झाल्यानंतर त्यात लाल तिखट, जीरे पूड, आमचूर पावडर, धने पूड आणि चवीनुसार मीठ टाका. एखादा मिनिटभर हे सगळं साहित्य चांगलं परतू द्या.
- आता हे मिरचीत भरण्याचं सारण म्हणजेच मिश्रण तयार झालं.
- हे मिश्रण अलगदपणे मिरचीत भरा. मिरचीमध्ये सारण कमी पडू देऊ नका. छान दाबून सारण भरा. कारण जेवढं सारण अधिक तेवढी चव जबरदस्त.

झणझणीत, कुरकुरीत मस्त करारी भरली भेंडी ! ही घ्या झणकेदार रेसिपी, चव अशी की भूक खवळेल..


- यानंतर एका कढईत दोन ते तीन टेबलस्पून तेल टाका.
- तेल गरम झाल्यानंतर भरलेल्या मिरच्या त्यात अलगद सोडा आणि चांगल्या परतून घ्या.
- नंतर कढईवर झाकण ठेवा आणि चांगली वाफ येऊ द्या.
- मिरची लालसर झाली आणि शिजल्यासारखी वाटली की गॅस बंद करा. आपली ही मिरची आता खाण्यासाठी तयार झाली आहे.
- कोणत्याही पद्धतीचं जेवण असलं तरी ही मिरची तोंडी लावायला घेऊ शकता.

 

Web Title: Rajasthani Food: Ahaha ... Rajasthani Bharwa Mirch! Try this recipe of spicy stuff chilli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.