Lokmat Sakhi >Food > राजस्थानातली रंगबिरंगी मकर संक्रांत, पौष वड्यांचा बेत-पंजिरी लड्डू आणि गुड गट्टा - पतंगांनी सजलेलं आकाश

राजस्थानातली रंगबिरंगी मकर संक्रांत, पौष वड्यांचा बेत-पंजिरी लड्डू आणि गुड गट्टा - पतंगांनी सजलेलं आकाश

मकर संक्रांत विशेष: राजस्थानातल्या पारंपरिक संक्रांत स्पेशल पदार्थांची चविष्ट मेजवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2024 04:57 PM2024-01-13T16:57:58+5:302024-01-13T17:04:08+5:30

मकर संक्रांत विशेष: राजस्थानातल्या पारंपरिक संक्रांत स्पेशल पदार्थांची चविष्ट मेजवानी

Rajasthan's colorful Makar Sankrant, panjiri laddus, Paush wada, and good gutta-kites | राजस्थानातली रंगबिरंगी मकर संक्रांत, पौष वड्यांचा बेत-पंजिरी लड्डू आणि गुड गट्टा - पतंगांनी सजलेलं आकाश

राजस्थानातली रंगबिरंगी मकर संक्रांत, पौष वड्यांचा बेत-पंजिरी लड्डू आणि गुड गट्टा - पतंगांनी सजलेलं आकाश

Highlightsसण,ऋतू आणि आहार विहार याची योग्य सांगड पारंपरिक पद्धतीत आहे.

शुभा प्रभू साटम

संपूर्ण भारतात संक्रांत अधिक साजरी केली जाते. अगदी दिवाळीपेक्षाही जास्त. उत्तर-दक्षिण सर्वदूर.  ईशान्य भारत, हिमाचल प्रदेश,उत्तर भारत, मध्य प्रदेश, दक्षिण भारत, महाराष्ट्र ते गुजराथ-राजस्थान ते जम्मू काश्मिर ते कन्याकुमारी.  गंमत म्हणजे या सर्व ठिकाणी खाल्ले जाणारे पदार्थ पणं खूप समान. गूळ मुख्य. तेच चित्र राजस्थानातही दिसतं.राजस्थानात संक्रांत /संकरात हा पर्यटन दृष्ट्या महत्त्वाचा सण. नदीत अथवा तलावात स्नान करून आरंभ होतो तो पतंग उडवण्याचा. पूर्ण आकाश रंगबिरंगी पतांगांनी फुलून जाते.

(Image : google)

राजस्थान मधे पतंग उडवून थांबत नाहीत तर रात्री दिवे पणं आकाशात सोडले जातात.
महत्वाचा मुद्दा काय की भौगोलिक दृष्ट्या भिन्नभिन्न राज्यातही संक्रांत सण, त्यानिमित्त सिध्द होणारे पदार्थ यात खूप साम्य आढळून येते. राजस्थानमधे पंजीरी लाडू होळीनिमित्त होतात. कणीक, मखाणे, सुका मेवा, खसखस जायफळ आणि भक्कम प्रमाणात तूप. हिवाळ्यात शरीराला ऊर्जा देतील असे घटक. आता सुकामेवा जो तो ऐपतीनुसर घालणार पणं बाकी पदार्थ तुलनेत तसे स्वस्त.
सण,ऋतू आणि आहार विहार याची योग्य सांगड पारंपरिक पद्धतीत आहे. अगदी १००% नसेल तरी थोडी आचरणात आणायला हरकत नसावी.
 

(Image : google)

राजस्थानात कोणते पदार्थ करतात?

१. नेहेमीप्रमाणे खाण्यात तीळ गुळ असणारे गजक, लाडू असतातच. त्याशिवाय एक वेगळा पदार्थ असतो पौष वडा. चवळी आणि मूग डाळ भजी. वास्तविक हा पौष महिन्यात होतो पणं संक्रांतीवेळी पणं नैवेद्य म्हणून दाखवला जातो. 
२. तसेच फेनी पण. तांदूळ दुधात गूळ घालून मऊ खीर केली जाते. 
३. आपले मराठी तीळ लाडू इथे तीळ पट्टी होतात. घटक तेच पणं पातळ लांबट आकार. 

 

(Image : google)

 

४. पंजिरी लाडू असतात. ते खास असतात.
५. आपल्याकडे जशी मूग खिचडी करतात तशी खिचडी,अर्थात तूप डावाने पडणार. 
६. गुड गट्टा नावाची नक्षीदार चिक्की जागोजागी विकली जाते आणि भोग म्हणून अर्पण होते.
७. थोडक्यात काय तर गूळ आणि तीळ भरपूर खाल्ले जातात.

(लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)
 

Web Title: Rajasthan's colorful Makar Sankrant, panjiri laddus, Paush wada, and good gutta-kites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.