Lokmat Sakhi >Food > प्रोटीन्सचा सुपर धमाका, राजगिरा क्रंच बार! करायला सोपी-मस्त रेसिपी 

प्रोटीन्सचा सुपर धमाका, राजगिरा क्रंच बार! करायला सोपी-मस्त रेसिपी 

Food And Recipe: गोड खावंसं वाटलं किंवा मग लहान मुलांना चॉकलेट खावं वाटलं तर सरळ हा राजगिरा क्रंची बार हातावर ठेवा... हेल्थसाठी एकदम बेस्ट.(how ro make rajgira crunch bar)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2022 11:00 AM2022-06-17T11:00:50+5:302022-06-17T11:05:01+5:30

Food And Recipe: गोड खावंसं वाटलं किंवा मग लहान मुलांना चॉकलेट खावं वाटलं तर सरळ हा राजगिरा क्रंची बार हातावर ठेवा... हेल्थसाठी एकदम बेस्ट.(how ro make rajgira crunch bar)

Rajgira Crunch Bar, rich source of proteins, Simple and tasty recipe | प्रोटीन्सचा सुपर धमाका, राजगिरा क्रंच बार! करायला सोपी-मस्त रेसिपी 

प्रोटीन्सचा सुपर धमाका, राजगिरा क्रंच बार! करायला सोपी-मस्त रेसिपी 

Highlightsराजगिऱ्यामध्ये कॅल्शियम आणि लोहदेखील भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे एखाद्या मोठ्या आजारपणातून उठलेल्या व्यक्तीला किंवा एचबी कमी असणाऱ्या व्यक्तींना राजगिरा नियमित खायला द्यावा. 

खरंतर आपल्या घरच्या पदार्थांमध्येच इतकं प्रोटीन असतं की, प्रोटीनचा (protein rich) शोध घेत बाहेर दुकानात जाण्याची आणि तिथून प्रोटीन पावडर, प्रोटीन शेक आणण्याची काही एक गरज नसते. आता राजगिरा हा देखील आपल्या स्वयंपाक घरातला अतिशय पौष्टिक पदार्थ. पण बऱ्याच घरांमध्ये तो उपवासाशिवाय बाहेरच येत नाही. त्यामुळे मग उपवास न करणारी मंडळी त्याच्या वाट्यालाच जात नाहीत. म्हणूनच तर वाचा हे राजगिरा खाण्याचे जबरदस्त फायदे (healthy benefits of rajgira) आणि करून बघा राजगिरा क्रंच बार. सेलिब्रिटी डाएटीशियन पुजा माखिजा (Pooja Makhija Recipe) यांनी ही रेसिपी त्यांच्या इन्स्टाग्राम पेजला शेअर केली आहे. 

 

राजगिरा खाण्याचे फायदे (Benefits of rajgira)
१. राजगिऱ्यामध्ये प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे प्रोटीन्सची कमतरता भरून काढण्यासाठी राजगिरा हा एक उत्तम स्त्रोत आहे. 
२. राजगिऱ्यामध्ये कॅल्शियम आणि लोहदेखील भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे एखाद्या मोठ्या आजारपणातून उठलेल्या व्यक्तीला किंवा एचबी कमी असणाऱ्या व्यक्तींना राजगिरा नियमित खायला द्यावा. 
३. राजगिऱ्याचा कोणताही पदार्थ पचनासाठी अतिशय हलका असतो.
४. मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस राजगिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात असतं. 
५. राजगिऱ्यामध्ये असणारे काही घटक केसांच्या वाढीसाठीही अतिशय पोषक असतात.
६. फॉलिक ॲसिड आणि झिंक हे घटकही राजगिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात असतात. 
७. राजगिऱ्यामध्ये असणारं फायटास्टरॉल काेलेस्टरॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतं.

 

राजगिरा क्रंची बार रेसिपी
साहित्य

राजगिरा, तूप, पीनट बटर पावडर, थोडंसं मीठ आणि खजूर
रेसिपी
- सगळ्यात आधी तर एक पॅन गॅसवर ठेवा आणि राजगिरा लाह्या सोनेरी रंगाच्या होईपर्यंत भाजून घ्या.
- लाह्या भाजून होईपर्यंत खजूरमध्ये पाणी टाकून त्याची पेस्ट करून घ्या. 
- लाह्या चांगल्या भाजून झाल्या की त्या एका बाऊलमध्ये काढून घ्या.
- गरम असतानाच त्यात खजुराची पेस्ट, पीनट बटर पावडर, थोडंसं मीठ आणि तूप टाका.
- हे सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. 
- एका डिशवर प्लॅस्टिक पसरवा, त्याला तूपाचा हात फिरवून घ्या आणि त्यावर हे मिश्रण ठेवून एकसमान पसरवून घ्या.
- त्यानंतर त्याच्या चौकोनी आकाराच्या छोट्या छोट्या वड्या करा.
- क्रंची, टेस्टी राजगिरा बार खाण्यासाठी तयार. 

 

Web Title: Rajgira Crunch Bar, rich source of proteins, Simple and tasty recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.