Lokmat Sakhi >Food > रक्षाबंधन स्पेशल: भावासाठी करा झक्कास बेत; संध्याकाळच्या मेन्यूचे ३ सोपे-झटपट पर्याय...

रक्षाबंधन स्पेशल: भावासाठी करा झक्कास बेत; संध्याकाळच्या मेन्यूचे ३ सोपे-झटपट पर्याय...

Rakhi Purnima Special Easy Simple Menu options : भाऊ येणार म्हटल्यावर त्याच्या आवडीचा बेत करालाच हवा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2023 10:38 AM2023-08-28T10:38:05+5:302023-08-28T10:39:20+5:30

Rakhi Purnima Special Easy Simple Menu options : भाऊ येणार म्हटल्यावर त्याच्या आवडीचा बेत करालाच हवा.

Rakhi Purnima Special Easy Simple Menu options Rakshabandhan Special: Do Zakkas meal for Brother; 3 easy-quick evening menu options… | रक्षाबंधन स्पेशल: भावासाठी करा झक्कास बेत; संध्याकाळच्या मेन्यूचे ३ सोपे-झटपट पर्याय...

रक्षाबंधन स्पेशल: भावासाठी करा झक्कास बेत; संध्याकाळच्या मेन्यूचे ३ सोपे-झटपट पर्याय...

रक्षाबंधन म्हणजे भावा-बहिणीचे नाते दृढ करणारा सण. या दिवशी बहिण आपल्या भाऊरायाला राखी बांधून आपले रक्षण करण्यास सांगते तर भाऊही तिचे रक्षण करण्यास आपण तयार आहोत असे आश्वासन देतो. आपल्या अवघड काळात आपल्याला सगळ्यात आधी आठवण येते ती आपल्या भाऊरायाचीच आणि तोही अगदी तातडीने आपल्या मदतीला धावून येत असतो. भाऊ घरी येणार म्हटल्यावर बहिणीला काय करु नी काय नको असे झालेले असते. आपल्या लाडक्या भाऊरायाला ओवाळण्यासाठी ती त्याला आपल्या घरी बोलावते. भाऊ येणार म्हटल्यावर त्याच्या आवडीचा बेत करालाच हवा. राखीपौर्णिमेला ऑफीसेसना सुट्टी नसल्याने साधारणपणे संध्याकाळीच सगळे बहिण भाऊ एकमेकांकडे जातात. संध्याकाळचे जेवण म्हटल्यावर नेहमीपेक्षा थोडा वेगळा बेत केला तरी चालतो. पाहूया भावा-बहिणींसाठी संध्याकाळी करता येईल असे मेन्यूचे पर्याय (Rakhi Purnima Special Easy Simple Menu options)...

१. पुरी भाजी

गरमागरम पुऱ्या आणि छोले, बटाटा किंवा अगदी मिक्स व्हेज अशी कोणतीही भाजी केली तरी बेत मस्त जमून जातो. पुरी सगळ्यांनाच आवडीची असल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खूश होतात. यासोबत एखादा पुलाव, मसालेभात, नारळीभात असा भाताचा प्रकार केला तरी चालतो. गुलाबजाम, जिलबी किंवा आईस्क्रीम असं गोडाचं काहीही ठेवू शकतो. 

(Image : Google)
(Image : Google)

२. पाव भाजी 

हा तर बहुतांश जणांच्या आवडीचा मेन्यू आणि करायलाही झटपट. भाज्या चिरुन शिजवून ठेवल्या की मग कांदा टोमॅटो आणि आलं-मिरची-लसूण पेस्ट घालून या सगळ्या भाज्या एकत्र करायच्या आणि यात मीठ आणि पावभाजी मसाला घालून सगळे छान एकजीव शिजवून घ्यायचे. यासोबत दहीभात, सॅलेड असे असेल तरी बाकी काहीच नसले तरी चालते. 

(Image : Google)
(Image : Google)

३. आलू पराठा आणि टोमॅटो सूप

आलू पराठा हा सगळ्यांनाच आवडीचा पदार्थ. यासोबत दही किंवा खोबऱ्याची चटणी असेल तरी पुरे होते. सोबत टोमॅटोचे सार किंवा सूप करता येऊ शकतो. दाल फ्राय आणि जीरा राईस केला की मेन्यू पूर्ण होतो. आधी तयारी झाली असेल की ऐनवेळी गरमागरम हे पराठे फारच छान लागतात. 

Web Title: Rakhi Purnima Special Easy Simple Menu options Rakshabandhan Special: Do Zakkas meal for Brother; 3 easy-quick evening menu options…

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.