Lokmat Sakhi >Food > रक्षाबंधन : १५ मिनीटांत करा ओल्या नारळाच्या खुटखुटीत वड्या; झटपट-गोड रेसिपी

रक्षाबंधन : १५ मिनीटांत करा ओल्या नारळाच्या खुटखुटीत वड्या; झटपट-गोड रेसिपी

Raksha bandhan Special 2022 Recipe Narali Vadi Easy Recipe : झटपट होणारी सोपी रेसिपी नक्की ट्राय करा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2022 02:21 PM2022-08-07T14:21:47+5:302022-08-07T14:31:56+5:30

Raksha bandhan Special 2022 Recipe Narali Vadi Easy Recipe : झटपट होणारी सोपी रेसिपी नक्की ट्राय करा...

Raksha bandhan Special 2022 Recipe: Make Vadi of wet coconut in 15 minutes; Quick-Coconut sweet recipe | रक्षाबंधन : १५ मिनीटांत करा ओल्या नारळाच्या खुटखुटीत वड्या; झटपट-गोड रेसिपी

रक्षाबंधन : १५ मिनीटांत करा ओल्या नारळाच्या खुटखुटीत वड्या; झटपट-गोड रेसिपी

Highlightsनारळी भात, नारळी पाकातले लाडू हे आपण नेहमीच करतो, एकदा नारळाची वडी करुन पाहा...नारळीपौर्णिमेनिमित्त नारळाची खास झटपट होणारी रेसिपी...

राखीपौर्णिमा म्हणजेच नारळीपौर्णिमा. महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या बऱ्याच भागांत हा सण अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. कोळी बांधवांमध्ये या सणाला विशेष महत्त्व असले तरी आपणही राखीपौर्णिमेच्या निमित्ताने हा दिवस साजरा करतो. भाऊरायाला राखी बांधून ओवाळणे, त्याच्याकडून ओवाळणी घेणे आणि त्यालाही प्रेमाने काहीतरी देणे असे या दिवशी आवर्जून होते. भावाला ओवाळून राखी बांधल्यानंतर त्याला नारळाचा गोड पदार्थ भरवला जातो. यामध्ये नारळी भात, नारळाचा लाडू, नारळाची करंजी, नारळाची वडी यांपैकी काही ना काही आवर्जून केले जाते (Raksha bandhan Special 2022). नारळी लाडू आपण नेहमी करत असलो तरी नारळाची वडी आपण क्वचितच करतो. पण खायला खुसखुशीत आणि तोंडात टाकली की विरघळणारी ही नारळाची वडी नेमकी कशी करायची असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. त्यासाठीच आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट अशी नारळाची वडी कशी करायची ते पाहणार आहोत (Narali Vadi Easy Recipe Coconut home made sweets). 

(Image : Google)
(Image : Google)

साहित्य : 

१. नारळाचा चव - २ वाट्या 

२. साखर - १ वाटी 

३. वेलची पावडर - पाव चमचा

४. साय किंवा मिल्क पावडर - अर्धी वाटी

५. तूप - २ चमचे

कृती :

१. नारळ फोडून त्याचा पांढरा शुभ्र चव काढून घ्यायचा. 

२. गॅसवर एक पॅन ठेवून त्यामध्ये १ चमचा तूप घालायचे.

(Image : Google)
(Image : Google)

३. तूपावर नारळाचा चव घालून तो चांगला परतून घ्यायचा.

४. नारळाचा चव थोडा कोरडा झाला की त्यामध्ये अर्धी वाटी साय किंवा मिल्क पावडर घालून चांगले परतू द्यायचे.

५. मग यामध्ये साखर आणि वेलची वापडर घालून पुन्हा चांगले हलवत राहायचे. 

६. साखर, वेलची पवडर एकत्र केल्यानंतर आणि चांगले परतल्यानंतर याचा रंग थोडा लालसर होतो. 

७. हे मिश्रण चांगले घट्ट होईपर्यंत एकजीव करत हलवत राहायचे. घट्टसर झाले की गॅस बंद करायचा.

८. एका थाळीला तूप लावू घ्यायते आणि हे मिश्रण गरम असतानाच त्यावर पसरवायचे. 

९. सेट करण्यासाठी बाहेर किंवा फ्रिजमध्ये ठेवायचे आणि नंतर त्याच्या एकसारख्या वड्या पाडून त्यावर आवडेल तो सुकामेवा घालायचा.                               

Web Title: Raksha bandhan Special 2022 Recipe: Make Vadi of wet coconut in 15 minutes; Quick-Coconut sweet recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.