रक्षाबंधनाला (Raksha Bandhan 2023) प्रत्येकाच्याच घरी गोड-धोड पदार्थ बनवले जातात. काही वेळा ही मिठाई बाहेरून आणली तर कधी घरीच गोड पदार्थांचा बेत केला जातो. (Raksha Bandhan Special) सणावाराच्या वेळेस बाजारातील गोड पदार्थांमध्ये भेसळ असण्याची शक्यता असते. भेसळयुक्त पदार्थांचे सेवन टाळण्यासाठी तुम्ही घरच्याघरी अगदी कमी वेळेत आणि कमी खर्चात मिठाई बनवू शकता.
ही मिठाई बनवण्यासाठी तुम्हाला स्वंयपाकघरातील २ ते ३ वस्तू लागतील. (Raksha Bandhan Special Kaju katli Recipe) काजू कतली बनवण्यासाठी सालं काढलेल्या काजूंचा वापर करा. (How to make kaju Katli at Home)
1) घरच्याघरी काजू कतली बनवण्यासाठी सगळ्यात आधी अडीचशे ग्राम काजू घ्या आणि व्यवस्थित धुवून घ्या.
2) २ ते ३ वेळा स्वच्छ पाण्यानं काजू धुतल्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यात घाला आणि गरजेनुसार थोडं, थोडं पाणी घालून बारीक पेस्ट बनवून घ्या.
3) नंतर गॅसवर कढई ठेवून त्यात काजूची पेस्ट घाला. या पेस्टमध्ये यात २०० ग्राम साखर घाला आणि मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्या.
4) एका थिक प्लास्टीकवर हा गोळा ठेवून हाताला तेल लावून व्यवस्थित मळून घ्या. त्यानंतर याचा मोठा गोळा तयार करून पराठ्याप्रमाणे जाडसर लाटून घ्या.
5) हे मिश्रण लाटून सपाट केल्यानंतर त्याला चांदीचा वर्ख लावा. त्यानंतर सुरीच्या साहाय्याने पतंगाप्रमाणे काप करून काजू कतली सर्व्ह करा.
काजू कतली परफेक्ट होण्यासाठी टिप्स
१) काजू मिक्सरमधून वाटताना पल्स मोडवर वाटा अन्यथा काजूचं तेल बाहेर येऊ शकतं.
२) काजू कतली बनवण्यासाठी नॉनस्टिक पॅन वापरा आणि ढवळत राहा जेणेकरून काजूचं मिश्रण खाली चिकटणार नाही.
३) प्लास्टीकला सर्व बाजूंनी फोल्ड करून घ्या. त्यानंतर त्यावर काजूची पेस्ट घाला
४) तुम्हाला चांदीचा वर्ख न लावता काजू कतली बनवायची असेल तर तुम्ही शेवटची स्टेप करू नका. थेट लाटल्यानंतर काजू कतलीचे काप करा.