Lokmat Sakhi >Food > रक्षाबंधन स्पेशल: लाडक्या भावासाठी घरीच करा केसर पेढा, अर्धा लिटर दुधाचे होतात सुंदर पेढे

रक्षाबंधन स्पेशल: लाडक्या भावासाठी घरीच करा केसर पेढा, अर्धा लिटर दुधाचे होतात सुंदर पेढे

Raksha Bandhan Special Sweets Recipe : घरच्याघरी फक्त अर्धा लिटर दुधापासून तुम्ही अप्रतिम चवीची मिठाई बनवू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 11:03 AM2023-08-23T11:03:37+5:302023-08-24T14:00:11+5:30

Raksha Bandhan Special Sweets Recipe : घरच्याघरी फक्त अर्धा लिटर दुधापासून तुम्ही अप्रतिम चवीची मिठाई बनवू शकता.

Raksha Bandhan Special Sweets Recipe : Raksha Bandhan Recipes Milk Kesar Pedha Recipe at Home | रक्षाबंधन स्पेशल: लाडक्या भावासाठी घरीच करा केसर पेढा, अर्धा लिटर दुधाचे होतात सुंदर पेढे

रक्षाबंधन स्पेशल: लाडक्या भावासाठी घरीच करा केसर पेढा, अर्धा लिटर दुधाचे होतात सुंदर पेढे

रक्षाबंधन म्हटलं की गोडधोड पदार्थ आलेच. कामाच्या गडबडीत घरी मिठाई बनवायला अजिबात वेळ मिळत नाही त्यामुळे आपण बाहेरून  मिठाई, लाडू-पेढे आणतो. (Milk Kesar Pedha Recipe) सणवाराच्या दिवसात मिठाईमध्ये भेसळ असण्याची शक्यता असते  त्यामुळे बाहेरून मिठाई आणणं टाळलेलंच उत्तम. घरच्याघरी फक्त अर्धा लिटर दुधापासून तुम्ही अप्रतिम चवीची मिठाई बनवू शकता. (Cooking Hacks)  अगदी १०  ते १५ मिनिटांत ही मिठाई बनून तयार होईल. (How to Make Mithai for Raksha Bandhan)

केसर पेढा कसा बनवावा?

१) केसर पेढा बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका भांड्यात दूध गरम करून घ्या. नंतर त्यात पिठी साखर घाला. पुन्हा दूध व्यवस्थित ढवळून घ्या. चिमुटभर केसर दूधात मिसळून ते दूधाच्या भांड्यात घाला. त्यानंतर दूध व्यवस्थित ढवळून घट्टसर होईपर्यंत शिजवा घ्या.  

२) त्यात २ ते ३ चमचे तूप, वेलची पूड घाला, बॅटर घट्ट झाल्यानंतर ते एका ताटात काढा. चमचाच्या साहाय्याने एक गोळा घेऊन हाताने गोल आकार द्या.  त्यानंतर पेढा थोडा चपटा करून त्यावर वेलची आणि केशर घाला. तयार आहे  केसर पेढा.

दूध बर्फी कशी बनवावी

१) दुधाची बर्फी बनवण्याासाठी सगळ्यात आधी कढईमध्ये दूध घाला आणि दूध उकळण्यासाठी ठेवा. दूध हाय फ्लेमवर उकळ्यानंतर आच मंद करा आणि दूध घट्ट होऊ द्या. दूध एका मोठ्या चमच्याने हलवत राहा. यामुळे खाली दूध चिकटणार नाही. दूध घट्ट होईपर्यंत व्यवस्थित शिजवा त्यानंतर त्यात मिल्क पावडर मिसळा. दूध पावडर मिसळ्यानं दूध घट्ट होतं आणि बर्फी अधिक घट्ट होते. जेव्हा दूध पूर्णपणे घट्ट होईल तेव्हा त्यात साखर घालून एकजीव करा.

२) दूध घट्ट झाल्यानंतर चमच्याने थोडं हातावर घेऊन त्याची कंसिन्टसी तपासून पाहा.  दूधाचं मिश्रण घट्ट झाल्यानंतर त्याला योग्य आकार द्या. गॅसची फ्लेम बंद कर आणि एका मोठ्या प्लेटमद्ये तूप लावून व्यवस्थित पसरवा. आता घट्ट दूध तूप लावलेल्या ताटात पसरवून त्यावर पिस्ता घाला. १५ मिनिटं सेट झाल्यानंतर बर्फीच्या आकारात कापा आणि प्लेटमधून बाहेर काढा. स्वादीष्ट दूध बर्फी तयार आहे. यात तुम्ही गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्याही मिसळू शकता. नैवेद्यासाठी आणि उपवासाच्या दिवशी ताटाला लावण्यासाठी हा पदार्थ उत्तम आहे. 

Web Title: Raksha Bandhan Special Sweets Recipe : Raksha Bandhan Recipes Milk Kesar Pedha Recipe at Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.