चैत्र नवरात्रीचा नववा आणि शेवटचा दिवस म्हणजे राम नवमी (Ram Navami) असतो. रामनवमी 30 मार्च साजरी करण्यात येणार आहे. रामनवमीला नैवेद्यासाठी अनेक घरांमध्ये गोड पदार्थ बनवले जातात. खीर, शिरा यापेक्षा काहीतरी वेगळं बनवायचं असेल तर तुम्ही या दिवशी बेसनाचे लाडू ट्राय करू शकता. जर तुम्हाला देवळात किंवा तुमच्या आजूबाजूच्यांना प्रसाद वाटायचा असेल तरी बेसनाचा लाडू हा उत्तम पर्याय आहे. (Besan Ladoo Easy Besan Ke Laddu)
बेसनाचे लाडू बनवताना आधी बेसन चांगले भाजून घ्यावे लागते. यासाठी थोडा वेळ लागतो. अनेक स्त्रिया उच्च किंवा मध्यम आचेवर बेसन भाजतात पण ही पद्धत चुकीची आहे. (Besan Ladoo Recipe) बेसन जास्त किंवा मध्यम आचेवर भाजून घेतल्यास बेसन कुठे चांगले भाजले जाते, तर कुठेतरी कच्चे राहते. अनेकवेळा बेसन मोठ्या आचेवर भाजल्यावर तेही जळून जाते. यामुळे लाडूंची चव बिघडते, तर बेसनाचे पीठ व्यवस्थित भाजलं गेलं नाही तर ते घश्याला चिकटते. (How to make besan ladu)
जर साजूक तुपाचे बेसन लाडू बनवत असाल तर कढईत सर्व तूप एकाच वेळी टाकू नका. बेसनाला आधी थोडे तूप घालून तळून घ्या, जेव्हा तुम्हाला गरज वाटली किंवा बेसन कोरडे दिसले तर त्यात आणखी थोडं तूप टाका. बेसनाच्या पिठाचा सुगंध यायला लागला आणि त्याचा रंग हलका तपकिरी झाला, तर समजून घ्या की बेसन चांगले भाजले आहे.
\
नैवेद्यासाठी बेसनाचे लाडू झटपट कसे बनवायचे?
बेसनाचे लाडू बनवण्यासाठी सगळ्यात आधी कपभर साखर पाण्यात वितळण्यासाठी ठेवा. साखर व्यवस्थित वितळवून पाक कोरडा होईपर्यंत शिजवा. एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात बेसन पीठ घाला. बेसन पीठ गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजा. पुन्हा तूप घालून हे मिश्रण एकजीव करून घ्या. पातळ होईपर्यंत मिश्रण चमच्याच्या साहाय्यानं ढवळत राहा. थोडं पाणी घालून मिश्रण एकसंध होईपर्यंत ढवळा. यात एक चमचा टरबुजाच्या बीया घालून या मिश्रणाचे लाडू वळून घ्या.