Lokmat Sakhi >Food > Diwali : यंदा दिवाळीत करा रतलामी शेव, घ्या परफेक्ट पारंपरिक रेसिपी - फराळाची वाढेल लज्जत...

Diwali : यंदा दिवाळीत करा रतलामी शेव, घ्या परफेक्ट पारंपरिक रेसिपी - फराळाची वाढेल लज्जत...

Ratlami Sev : How To Make Ratlami Sev At Home For Diwali : Ratlami Sev Recipe : यंदाच्या दिवाळीत नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या चटकदार चवीची रतलामी शेव खाऊन तर पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2024 06:49 PM2024-10-23T18:49:26+5:302024-10-23T19:04:25+5:30

Ratlami Sev : How To Make Ratlami Sev At Home For Diwali : Ratlami Sev Recipe : यंदाच्या दिवाळीत नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या चटकदार चवीची रतलामी शेव खाऊन तर पाहा...

Ratlami Sev How To Make Ratlami Sev At Home For Diwali Ratlami Sev Recipe | Diwali : यंदा दिवाळीत करा रतलामी शेव, घ्या परफेक्ट पारंपरिक रेसिपी - फराळाची वाढेल लज्जत...

Diwali : यंदा दिवाळीत करा रतलामी शेव, घ्या परफेक्ट पारंपरिक रेसिपी - फराळाची वाढेल लज्जत...

दिवाळी (Diwali 2024) म्हटलं की आपल्याला सगळ्यात आधी आठवतो तो फराळ. दिवाळीच्या फराळात लाडू, चिवडा, करंजी, अनारसे, चकली, शेव असे अनेक पदार्थ केले जातात. फराळाच्या सगळ्या पदार्थांमध्ये प्रत्येकाच्या घरी हमखास तयार केली जाणारी शेव सगळ्यांच्याच विषेश आवडीची असते. अगदी पटापट होणारा हा दिवाळी फराळातील एक खास पदार्थ आहे. कुणाला तिखट, कुणारी बारीक, कुणाला जाड प्रत्येकाला वेगवेगळी शेव आवडते(Ratlami Sev)

शेव कोणतीही असो पण फक्त ती कुरकुरीत आणि खुसखुशीत असायला हवी एवढीच इच्छा असते. फराळाच्या ताटातील शेव म्हटलं की पिवळ्या रंगाची नेहमीची शेव आपल्या डोळ्यासमोर येते. पण त्यालाच थोडा ट्विस्ट द्यायचा असेल तर घरच्या घरी रतलामी शेव(Ratlami Sev Recipe) अगदी सहज करता येते. कमीत कमी जिन्नस वापरुन होणारी, जाता येता खाल्ली जाणारी आणि सगळ्यांच्या आवडीची अशी ही रतलामी शेव चविष्ट तर लागतेच आणि लगेच संपतेही. यंदाच्या दिवाळीला नेहमीची तीच ती पिवळी किंवा लाल शेव करण्यापेक्षा रतलामी शेव नक्की ट्राय करुन पाहा(How To Make Ratlami Sev At Home For Diwali).   

साहित्य :- 

१. बेसन - २ कप 
२. लवंगी मिरची पावडर - १ टेबलस्पून 
३. मीठ - चवीनुसार 
४. लवंग पावडर - १ टेबलस्पून 
५. गरम मसाला - १ टेबलस्पून 
६. काळीमिरी पूड - १ टेबलस्पून 
७. हिंग - १/२ टेबलस्पून 
७. ओवा - १ टेबलस्पून 
८. तेल - १ कप 
९. पाणी - गरजेनुसार 

कोण म्हणते अनारसा करणे कठीण काम? ही घ्या झटपट अनारसे करण्याची कृती, खा जाळीदार अनारसे...


फराळ करण्यापूर्वी करून ठेवा १० गोष्टी, फराळ बिघडणे-तेल सांडणे आणि रात्रभर जागरण टळेल...

कृती :- 

१. एका मोठ्या बाऊलमध्ये बेसन घेऊन त्यात लवंगी मिरची पावडर, चवीनुसार मीठ, लवंग पावडर, गरम मसाला, काळीमिरी पूड, हिंग, ओवा असे सगळे सुके मसाले घालावेत. सुके मसाले घातल्यानंतर ते व्यवस्थित चमच्याने ढवळून बेसन पिठात मसाले मिसळून घ्यावेत. 
२. आता या बेसन पिठात तेल घालून हाताने हलकेच पीठ आणि तेल कालवून घ्यावे. 
३. बाऊलमधील बेसन पिठात गरजेनुसार थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यावे. 
४. पीठ मळून झाल्यानंतर या पिठाचा एक गोळा घ्यावा. या गोळ्याला हलकेच पाण्याचा हात लावून पुन्हा एकदा पीठ मळून घ्यावे. पीठ मळून झाल्यानंतरच पिठाचा गोळा साच्यात घालावा. 

ना भाजणीची धावपळ, ना तेलात चकली विरघळण्याचं टेंशन, १० मिनिटांत करा इन्स्टंट बटर चकली...

५. आता एका कढईत तेल घेऊन तेल व्यवस्थित गरम करून घ्यावे. या गरम तेलात साच्याच्या मदतीने शेव पाडून घ्याव्यात. 
६. शेव ३ ते ४ मिनिटे खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्याव्यात. त्यानंतर या शेव एका भांड्यात काढून थोड्या गार होऊ द्याव्यात. शेव व्यवस्थित गार झाल्यानंतरच त्या एका हवाबंद डब्यांत स्टोअर करून ठेवाव्यात. 

गरमागरम रतलामी शेव खाण्यासाठी  तयार आहेत.

Web Title: Ratlami Sev How To Make Ratlami Sev At Home For Diwali Ratlami Sev Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.