Join us  

ब्रेकफास्टला १५ मिनीटांत करा चविष्ट रवा आप्पे, सकाळच्या घाईत होणारी झटपट रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2023 9:20 AM

Rava Appe Recipe : साऊथ इंडियन म्हटल्यावर आपण साधारणपणे इडली, डोसा किंवा उतप्पा करतो, पण आज पाहूयात इंस्टंट आप्पे

ठळक मुद्देभाज्या किसून घातल्याने हे आप्पे पौष्टीकही होतातसकाळी घाईच्या वेळी चविष्ट असे आप्पे केल्यास सगळेच आवडीने खातात

ब्रेकफास्टला रोज सकाळी उठून काय करायचे असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडतो. सतत पोहे, उपीट खाऊन कंटाळा तर आलेला असतोच. पण त्यातून शरीराला म्हणावे तसे फार काही मिळतेच असेही नाही. अशावेळी झटपट होणारी आणि सगळ्यांना आवडेल अशी हटके रेसिपी केली तर सगळेच खूश होतात. रवा असल्याने पचायला हलके आणि पौष्टीक अशी हे आप्पे अतिशय चविष्ट होतात. साऊथ इंडियन म्हटल्यावर आपण साधारणपणे इडली, डोसा किंवा उतप्पा करतो. पण आप्पे फारसे केले जात नाहीत (Rava Appe Recipe). 

झटपट होणारे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील असे हे आप्पे करायला सोपे आणि खायलाही चविष्ट असल्याने आपण नाश्त्यासाठी अवश्य करु शकतो. हे आप्पे जास्त पौष्टीक व्हावेत यासाठी आपण यामध्ये घरात उपलब्ध असलेल्या भाज्या घालू शकतो. त्यामुळे पोटात भाज्या जायलाही मदत होते आणि मुलांना वेगळं काही दिल्याचा आनंदही मिळतो. पाहूया आप्पे करण्याची सोपी झटपट रेसिपी...

साहित्य -

१. रवा - १ ते १.५ वाटी 

२. दही - अर्धी वाटी

३. सोडा - अर्धा चमचा 

(Image : Google)

४. मीठ - चवीनुसार 

५. बारीक चिरलेला कांदा - अर्धी वाटी 

६. गाजर - अर्धी वाटी (किसलेले)

७. बीट - अर्धी वाटी (किसलेले)

८. टोमॅटो - १

९. कोबी - अर्धी वाटी

१०. कोथिंबीर - अर्धी वाटी 

११. आलं-लसूण पेस्ट - अर्धा चमचा

१२. जीरे- अर्धा चमचा 

१३. मिरची - १ ते २ 

१४ तेल - अर्धी वाटी 

कृती -

१. रव्यामध्ये दही, मीठ आणि पाणी घालून पीठ एकजीव भिजवून घ्यावे. 

२. यामध्ये आलं, लसूण पेस्ट, मिरचीचे तुकडे, जीरे आणि सोडा घालून पीठ पुन्हा एकजीव भिजवावे.

३. यामध्ये कांदा, टोमॅटो, किसलेल्या भाज्या आणि कोथिंबीर घालावी. 

४. १५ मिनीटे हे सगळे चांगले भिजवून ठेवावे

५. आप्पे पात्रात तेल घालून त्यामध्ये हे मिश्रण घालावे.

६. एका बाजुने आप्पे झाले की उलटून दुसऱ्या बाजुने चांगले होऊ द्यावेत.

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.