Lokmat Sakhi >Food > रवा-बेसनाचा करा इन्स्टंट ढोकळा, फक्त १५ मिनिटांत स्पॉन्जी ढोकळा रेडी, शाळेच्या डब्यासाठी मस्त खाऊ

रवा-बेसनाचा करा इन्स्टंट ढोकळा, फक्त १५ मिनिटांत स्पॉन्जी ढोकळा रेडी, शाळेच्या डब्यासाठी मस्त खाऊ

Rava besan dhokla | suji besan dhokla | dhokla chutney : चवीला बेस्ट पोटासाठीही उत्तम, रवा - बेसनाचा ढोकळा एकदा करून पाहाच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2024 10:00 AM2024-07-18T10:00:00+5:302024-07-18T12:13:03+5:30

Rava besan dhokla | suji besan dhokla | dhokla chutney : चवीला बेस्ट पोटासाठीही उत्तम, रवा - बेसनाचा ढोकळा एकदा करून पाहाच..

Rava besan dhokla | suji besan dhokla | dhokla chutney | रवा-बेसनाचा करा इन्स्टंट ढोकळा, फक्त १५ मिनिटांत स्पॉन्जी ढोकळा रेडी, शाळेच्या डब्यासाठी मस्त खाऊ

रवा-बेसनाचा करा इन्स्टंट ढोकळा, फक्त १५ मिनिटांत स्पॉन्जी ढोकळा रेडी, शाळेच्या डब्यासाठी मस्त खाऊ

पावसाळ्यात नेहमी चवदार आणि हटके पदार्थ खाण्याची इच्छा होते (Dhokla recipe). आपण या दिवसात बाहेरचं जास्त प्रमाणात खातो. नाश्त्याला देखील काहीतरी हटके खाण्याची इच्छा होते (Food). पोळी - भाजी, साऊथ इंडियन, उपमा आणि पोहे आपण खातोच. पण कधी कधी याहून वेगळं काहीतरी खाण्याची इच्छा होते (Cooking Tips). अशावेळी आपण गुजराथी पदार्थ खमण ढोकळा खातो.

पण घरात तयार केल्यास खमण ढोकळा मनासारखा तयार होत नाही. ढोकळा कधी फसतो, तर कधी फुगतच नाही. डाळ - तांदुळाचा आणि बेसनाचा ढोकळा आपण करतोच. पण कधी रवा आणि बेसनाचा ढोकळा ट्राय करून पाहिलं आहे का? आपण ही रेसिपी खास मुलांच्या टिफिनसाठी त्यांना तयार करून देऊ शकता. अगदी १५ मिनिटात हा पदार्थ झटपट रेडी होतो(Rava besan dhokla | suji besan dhokla | dhokla chutney).

रवा - बेसनाचा ढोकळा करण्यासाठी लागणारं साहित्य

बेसन

कोणता ब्रेड खाणं तब्येतीसाठी योग्य? व्हाइट की ब्राऊन? कोणता लवकर पचतो, कशाने वाढतं वजन?

दही

रवा

आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट

मीठ

साखर

हळद

लिंबाचा रस

तेल

इनो

लाल तिखट

कृती

सर्वात आधी एका बाऊलमध्ये एक कप बेसन, एक कप रवा, दही आणि दीड कप पाणी घालून मिक्स करा. त्यावर २० मिनिटांसाठी झाकण ठेवा. नंतर त्यात एक चमचा आलं, लसूण हिरवी मिरचीची पेस्ट, साखर, चवीनुसार मीठ, हळद, २ टेबलस्पून लिंबाचा रस आणि २ टेबलस्पून तेल घालून मिक्स करा.

पोह्याचे आप्पे एकदा खाऊन तर पाहा, शाळेच्या डब्यासाठीही झटपट होणारा पौष्टीक पदार्थ, चवीलाही उत्तम

नंतर त्यात एक छोटा चमचा इनो आणि थोडं पाणी घालून बॅटर तयार करा. एका प्लेटला ब्रशने थोडं तेल लावा, त्यावर बॅटर ओतून पसरवा, आणि चिमुटभर लाल तिखट शिंपडा. स्टीमरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात स्टॅण्ड ठेवा. स्टॅण्डवर ताट ठेऊन झाकण ठेवा. वाफेवर ढोकळा शिजवून घ्या. १५ मिनिटानंतर गॅस बंद करा.

ढोकळा थंड झाल्यानंतर सुरीने कट करून घ्या, व त्यावर जिरं, मोहरी, साखर, कडीपत्ता आणि हिरवी मिरचीची फोडणी ओता. अशा प्रकारे स्पॉन्जी ढोकळा खाण्यासाठी रेडी.

Web Title: Rava besan dhokla | suji besan dhokla | dhokla chutney

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.