दिवाळी (Diwali 2024) म्हटलं की चमचमीत फराळ खाणं आलंच. करंजी, शंकरपाळी, चिवडा, लाडू बनवले जातात. पण फराळांमध्ये चकली आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे (Chakli Recipe). कुरकुरीत चकली कुणाला नाही आवडत. पण कुरकुरीत चकली करायला प्रत्येकालाच जमेलच असं नाही (Diwali Faral). कधी चकली तेलकट होते, तर कधी तळताना चकली तेलात विरघळतात. भाजणीशिवाय चकली तयार होतच नाही.
जर आपल्याला भाजणीशिवाय कुरकुरीत चकली करायची असेल तर, रव्याची चकली करून पाहा. काही वेळेला भाजणी करायला वेळ मिळत नाही. अशावेळी आपण झटपट रव्याची कुरकुरीत काटेरी चकली करून पाहू शकता. यासाठी आपल्याला विशेष मेहनत घेण्याची गरज नाही(rava chakli recipe | instant chakli recipe | Instant evening snacks).
रव्याची कुरकुरीत चकली करण्यासाठी लागणारं साहित्य
रवा
पाणी
थुलथुलीत पोट होईल सपाट - बॅड कोलेस्टेरॉलही येईल नियंत्रणात; फक्त रोज चमचाभर 'ही' चटणी खा
लाल तिखट
हळद
धणेपूड
हिंग
तूप
मीठ
ओवा
पांढरे तीळ
तांदुळाचं पीठ
कृती
सर्वात आधी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात दोन कप पाणी घाला. पाणी कोमट झाल्यानंतर त्यात ४ टेबलस्पून लाल तिखट, २ चमचे हळद, ५- ६ धणेपूड, चिमुटभर हिंग, २ टेबलस्पून तूप, चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.
पाण्याला उकळी फुटल्यानंतर त्यात १ कप बारीक रवा घालून मिक्स करा. त्यात गुठळ्या राहणार नाही याची काळजी घ्या. नंतर त्यात एक चमचा ओवा आणि पांढरे तीळ घालून मिक्स करा. नंतर गॅस बंद करा.
दिवाळीत फोटो सुंदर यायला हवेत? आजपासून फॉलो करा ७ गोष्टी- १० दिवसांत घटेल वजन
एक परात घ्या. त्यात रव्याचे मिश्रण काढून घ्या. नंतर त्यात एक कप तांदुळाचं पीठ घालून हाताने कणिक मळून घ्या. कणिक मळून झाल्यानंतर चकलीचा साचा घ्या. त्यात कणकेचा गोळा घाला, आणि एका पेपरवर चकली पाडून घ्या.
दुसरीकडे कढईत तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. कडकडीत तेलात चकली सोडून दोन्ही बाजूने तळून घ्या. तळलेले चकली एका पेपरमध्ये काढून घ्या. थोड्या वेळाने चकली डब्यामध्ये भरून ठेवा. अशा प्रकारे कुरकुरीत काटेरी चकली खाण्यासाठी रेडी.