Lokmat Sakhi >Food > Rava Dosa Recipe : रविवार स्पेशल : सकाळच्या नाश्त्याला करा जाळीदार रवा डोसा; रेसिपी सोपी आणि झटपट

Rava Dosa Recipe : रविवार स्पेशल : सकाळच्या नाश्त्याला करा जाळीदार रवा डोसा; रेसिपी सोपी आणि झटपट

Rava Dosa Recipe : रवा डोसा करण्यासाठी तुम्हाला कोणतंही मिश्रण भिजवून ठेवावं लागत नाही. ऐनवेळी पटकन डोसे तयार करता येतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 07:55 PM2022-11-25T19:55:28+5:302022-11-26T13:48:02+5:30

Rava Dosa Recipe : रवा डोसा करण्यासाठी तुम्हाला कोणतंही मिश्रण भिजवून ठेवावं लागत नाही. ऐनवेळी पटकन डोसे तयार करता येतात.

Rava Dosa Recipe : Instant rava dosa recipe easy to make rava dosa recipe | Rava Dosa Recipe : रविवार स्पेशल : सकाळच्या नाश्त्याला करा जाळीदार रवा डोसा; रेसिपी सोपी आणि झटपट

Rava Dosa Recipe : रविवार स्पेशल : सकाळच्या नाश्त्याला करा जाळीदार रवा डोसा; रेसिपी सोपी आणि झटपट

मऊ, जाळीदार रवा डोश्याचं नाव घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतं. रवा डोसा खायला स्वादीष्ट असून करायला फक्त ५ ते १० मिनिटं लागतात. सकाळी घाईच्यावेळी हा पदार्थ बनवल्यास जास्त मेहनत न करता नाश्ता तयार होईल. सांभार, खोबऱ्याची चटणी, सॉस किंवा बटाट्याच्या भाजीबरोबर तुम्ही हे डोसे खाऊ शकता. (Instant rava dosa recipe easy to make rava dosa recipe) रवा डोसा करण्यासाठी तुम्हाला कोणतंही मिश्रण भिजवून ठेवावं लागत नाही. ऐनवेळी पटकन डोसे तयार करता येतात. या लेखात रवा डोश्याची इजी टू मेक रेसेपी पाहूया, (How to make rava dosa)

साहित्य

रवा - 1 कप 

दही - ½ कप 

कोथिंबीर - १ 

हिरवी मिरची - १ किंवा २ बारीक चिरलेली

आले पेस्ट - ½ टीस्पून

मीठ - ½ टीस्पून किंवा चवीनुसार

जिरे - ½ टीस्पून

तेल - 3 ते 4 चमचे

कृती

१) एका मोठ्या भांड्यात रवा घ्या. त्यात दही, आले पेस्ट, हिरवी मिरची, मीठ, जिरे आणि हिरवी धणे घाला. सर्व गोष्टी नीट मिक्स करा. थोडं थोडं पाणी घालून  डोस्याचं पीठ बनवा. 

२) पिठात १ कप पाणी वापरा. 10 ते 15 मिनिटे पिठ तसेच ठेवा म्हणजे रवा फुगेल. 10 मिनिटांनं जर पीठ घट्ट वाटलं तर आणखी 2 चमचे पाणी घाला आणि मिक्स करा.

३) डोसा बनवण्यासाठी नॉन-स्टिक तवा गरम करण्यासाठी ठेवा. तव्यावर थोडे तेल टाका आणि तव्याभोवती बॅटर चांगले पसरवा आणि पॅन थोडा वेळ थंड होऊ द्या. टिश्यू पेपरच्या मदतीने पॅनमधून अतिरिक्त तेल काढा.

४) तव्यावर 2 ते 3 चमचे डोश्याचे पिठ घाला आणि गोलाकार पातळ पसरवा. नंतर गॅसची फ्लेम वाढवा आणि डोसाच्या वर आणि बाजूंना थोडे तेल लावा. डोसा खालच्या बाजूने सोनेरी तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या. तयार आहे रवा डोसा

Web Title: Rava Dosa Recipe : Instant rava dosa recipe easy to make rava dosa recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.