नाश्त्याला रोजचे पदार्थ खाऊन अनेकदा कंटाळा येतो (Idli Recipe). इडली, डोसा, चपाती भाजी, अप्पे, मेदू वडे, पोहे आणि उपमा घरात हे पदार्थ हमखास केले जातात. हे पदार्थ टिफिनसाठीही मुलांना दिले जातात (Food). पण रोजचे पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही (Cooking Tips). जर आपल्याला साऊथ इंडियन पदार्थात काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर, मऊ लुसलुशीत रवा इडली करून खा.
रवा इडली आपण सर्वांनी घरात करून पाहिलं असेल. पण घरात रवा इडली करताना कडक होते किंवा व्यवस्थित फुलत नाही. जर आपल्याला हटके इडली खाऊन पाहायचं असेल तर, एकदा झटपट रवा इडली करून पाहा. मुलांच्या टिफिनसाठीही बेस्ट ऑप्शन आहे(Rava Idli (Easy and No Fermentation) check out super easy recipe).
झटपट मऊ लुसलुशीत रवा इडली कशी करायची?
लागणारं साहित्य
रवा
दही
वरणाला फोडणी देताना तेलाचा वापर करावा की तुपाचा? हाडं मजबूत ते वेट लॉस; पाहा कशाने फायदा होईल?
हळद
तेल
मोहरी
पाणी
बेकिंग सोडा
कृती
सर्वात आधी कढई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. त्यात एक चमचा तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा मोहरी आणि हळद घाला. मोहरी तडतडल्यानंतर त्यात एक कप रवा घाला, आणि रवा भाजून घ्या. भाजून घेतलेला रवा एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात एक कप दही, चवीनुसार मीठ, एक कप पाणी घालून मिक्स करा. नंतर त्यावर १५ मिनिटांसाठी झाकण ठेवा.
गव्हाच्या पिठात मिसळा १ खास पीठ; शुगरही वाढणार नाही आणि वजनही होईल कमी आणि..
१५ मिनिटानंतर त्यात एक चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा पाणी घालून मिक्स करा. स्टीमरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवा. इडली पात्राला ब्रशने तेल लावा. त्यात चमचाभर मिश्रण ओता. इडली पात्र स्टीमरमध्ये ठेवा. १० मिनिटांसाठी वाफेवर इडल्या शिजवून घ्या. अशाप्रकारे पौष्टीक हलकी फुल्फी लुसलुशीत रवा इडली खाण्यासाठी रेडी.