साऊथ इंडियन पदार्थांमध्ये इडली (Idli) मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. इडली वेगवेगळ्या पद्धतीने बनवता येते. पण रव्याची इडली ही लोकप्रिया व्हरायटी आहे जी ब्रेकफास्टसाठी परफेक्ट डिश आहे. रव्याची इडली टेस्टी आणि हेल्दीसुद्धा असते. (Cooking Hacks) नाश्त्याव्यतिरिक्त हलकी फुलकी भूक लागल्यानंतर तुम्ही ही इडली खाऊ शकता. रव्याची इडली लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. रव्याची इडली करण खूपच सोपं आहे. सॉफ्ट रव्याची इडली तयार करण्यासाठी तुम्हाला फार साहित्य लागणार नाही. कमीत कमी साहित्यात इडल्या बनून तयार होतील. (How To Make Rava Idli)
रवा इडली करण्यासाठी लागणारं साहित्य
1) रवा - १ कप
२) दही - अर्धा कप
३) पाणी - अर्धा कप
४) मीठ- १ छोटा चमचा
५) फ्रुट सॉल्ट - अर्धा चमचा
६) तेल- इडली मोल्डला ग्रीस करण्यासाठी
रवा इडली करण्याची सोपी कृती
रव्याची इडली बनवणं खूपच सोपं आहे. ही इडली एकदम सॉफ्ट बनते. रव्याची इडली तयार करण्यासाठी सगळ्यात आधी एका मोठ्या भांड्यात रवा घ्या, त्यात दही आणि गरजेनुसार पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. १५ ते २० मिनिटांसाठी झाकून ठेवून द्या जेणेकरून रवा व्यवस्थित फुलेल.
रवा फुलल्यानंतर त्यात मीठ आणि फ्रुट सॉल्ट घाला आणि व्यवस्थित एकजीव करून घ्या. नंतर इडली मोल्डला तेलानं व्यवस्थित ग्रीस करा. त्यानंतर रव्याचे बॅटर इडलीच्या मोल्डमध्ये भरा. बॅटर भरल्यानंतर मोल्ड इडली स्टीमरमध्ये ठेवून १० ते १२ मिनिटं वाफवून घ्या. निश्चित वेळेत स्टिमर खोलून इडली शिजली आहे की नाही ते तपासून पाहा. इडली शिजल्यानंतर मोल्डमधून बाहेर काढा. स्वादीष्ट एकदम फुललेली रवा इडली तयार आहे. इडली नारळाची चटणी किंवा सांबारसोबत खा.
रव्याची इडली बिघडू नये यासाठी खास टिप्स
रवा व्यवस्थित भिजवा जेणेकरून इडली मऊ, मुलायाम बनेल. फ्रुट सॉल्ट घातल्यानंतर बॅटर लवकर वाफवून घ्या. अन्यथा इडल्या फुलण्याऐवजी कडक होतील. रव्याच्या बॅटरमध्ये थोडं जीर, कोथिंबीर घालू शकता. जर तुमच्याकडे इडली स्टिमर नसेल तर तुम्ही मोठ्या भांड्यात पाणी गरम करून इडली बनवू शकता.