Lokmat Sakhi >Food > डाळ - तांदूळ न भिजवता, न आंबवता; अगदी १५ मिनिटात करा सॉफ्ट 'तडका' इडली; मुलांच्या टिफिनसाठी बेस्ट

डाळ - तांदूळ न भिजवता, न आंबवता; अगदी १५ मिनिटात करा सॉफ्ट 'तडका' इडली; मुलांच्या टिफिनसाठी बेस्ट

Rava Idli Recipe - Soft and Spongy South Indian Suji Idli : 'तडका' इडली कधी खाऊन पाहिली आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2024 03:47 PM2024-07-05T15:47:51+5:302024-07-05T15:50:01+5:30

Rava Idli Recipe - Soft and Spongy South Indian Suji Idli : 'तडका' इडली कधी खाऊन पाहिली आहे का?

Rava Idli Recipe - Soft and Spongy South Indian Suji Idli | डाळ - तांदूळ न भिजवता, न आंबवता; अगदी १५ मिनिटात करा सॉफ्ट 'तडका' इडली; मुलांच्या टिफिनसाठी बेस्ट

डाळ - तांदूळ न भिजवता, न आंबवता; अगदी १५ मिनिटात करा सॉफ्ट 'तडका' इडली; मुलांच्या टिफिनसाठी बेस्ट

नाश्त्यासाठी साऊथ इंडिअन पदार्थ आवर्जून खाल्ले जातात (Idli Recipe). इडली, मेदूवडे, डोसा, आप्पे हे पदार्थ चवीला भन्नाट लागतात. बहुतांश लोक नाश्त्याला मऊ, लुसलुशीत इडली खातात. इडलीचे अनेक प्रकार आहेत (Food). फक्त डाळ - तांदुळाची नसून, रव्याचीही इडली केली जाते. रव्याची इडली बऱ्याचदा फसते (Cooking Tips). नीट फुलत नाही. किंवा रव्याच्या गुठळ्या तशाच राहतात.

अनेकदा मुलं डब्यासाठी इडली हवी असा हट्ट धरतात. पण जर आपण डाळ - तांदूळ भिजत घालायला विसरले असाल तर, रव्याची इन्स्टंट तडका इडली करून पाहा. पौष्टीक आणि बॅटर न आंबवता, काही मिनिटात रव्याची इडली तयार होतील(Rava Idli Recipe - Soft and Spongy South Indian Suji Idli).

रव्याची इन्स्टंट इडली करण्यासाठी लागणारं साहित्य

रवा

दही

पाणी

मीठ

तेल

मोहरी

जिरं

उडीद डाळ

पावसाळ्यात शिळं अन्न खाताय? किती तासांनी पदार्थ खाल्ले तर फूड पॉयझनिंगचा धोका, आजारांना आमंत्रण

हिरवी मिरची

कडीपत्ता

काजू

बेकिंग सोडा

कृती

सर्वात आधी कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात एक कप जाड रवा घालून भाजून घ्या. रवा भाजून घेतल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या. रवा थंड झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा मीठ, एक कप दही आणि अर्धा कप पाणी घालून मिक्स करा, त्यावर १० मिनिटांसाठी झाकण ठेवा. जेणेकरून दह्यामध्ये रवा छान भिजेल.

५ भाज्या नियमित खा, प्रोटीन मिळेल भरपूर- पन्नाशीतही दुखणार नाहीत हाडं- प्रोटीन पॉवरहाऊसची कमाल

दुसरीकडे स्टीमरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवा. इडली पात्राला ब्रशने तेल लावा. फोडणीच्या पळीत एक चमचा तेल घाला. नंतर त्यात मोहरी, जिरं, उडीद डाळ, हिरवी मिरची, कडीपत्ता आणि काजू घालून मिक्स करा. तयार फोडणी बॅटरमध्ये ओता आणि अर्धा कप पाणी घालून चमच्याने मिक्स करा. नंतर त्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून मिक्स करा.

तयार चमचाभर बॅटर इडली पात्राच्या प्रत्येक भागात भरा. इडली पात्र स्टीमरमध्ये ठेवा, आणि झाकण लावा. १० ते १२ मिनिटांसाठी इडली मिडिअम फ्लेमवर शिजवून घ्या. १५ मिनिटानंतर इडली पात्रातून चमच्याने इडली बाहेर काढा. अशा प्रकारे रव्याची सॉफ्ट इडली खाण्यासाठी रेडी. आपण रव्याची इडली चटणी किंवा सांबारसोबत खाऊ शकता.

Web Title: Rava Idli Recipe - Soft and Spongy South Indian Suji Idli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.