Join us  

ना साखरेच्या पाकाची झंझट, ना लाडू कडक होण्याची भीती; १५ मिनिटांत करा बिनपाकाचे रवा लाडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2024 10:00 AM

Rava ladoo recipe, how to make rava laddoo without sugar syrup : पाक न करता करा रव्याचे खुसखुशीत लाडू

दिवाळीत (Diwali Faral) फराळामध्ये चटपटीत पदार्थासोबत गोडही पदार्थ केले जातात (Rava Laddoo). लाडू, करंजी आणि शंकरपाळ्या, हे तिन्ही पदार्थ लवकर संपतात. ज्यात लाडवाला खवय्यांकडून अधिक पसंती मिळते (Cooking Tips). लाडू अनेक प्रकारचे केले जातात. रवा, शेव, बुंदीचे लाडू आपण खाल्लेच असतील. हे लाडू करताना साखरेच्या पाकाचा वापर होतो. पाकामुळे लाडवाला आकार मिळतो.

लाडवामध्ये रव्याचे लाडू सर्वात आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ. पण रव्याचे लाडू करणं सोपं नाही. पाकामुळे रव्याचे लाडू व्यवस्थित होतात. मधुमेहग्रस्त रुग्ण किंवा फिटनेस फ्रिक लोक साखरेच्या पाकातले लाडू खाण्यास टाळाटाळ करतात. जर आपल्याला साखरेच्या पाकाचा वापर न  करता, रव्याचे लाडू करायचे असतील, तर ही रेसिपी नक्कीच फॉलो करून पाहा. अगदी मिनिटात रव्याचे तोंडात विरघळणारे लाडू तयार होतील(Rava ladoo recipe, how to make rava laddoo without sugar syrup).

रव्याचे तोंडात विरघळणारे लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य

रवा

हातापायांच्या काड्या पण पोट मात्र खूप सुटलंय? ५ सोप्या टिप्स, शरीर सुडौल -पोट होईल कमी

तूप

साखर

कृती

सर्वात आधी एका बाऊलमध्ये दोन कप रवा घ्या. रवा नेहमी बारीक घ्यावा. जेणेकरून रवा छान आणि लवकर भाजला जाईल. जर दोन कप रवा घेतला असेल तर, मिक्सरच्या भांड्यात एक कप साखर आणि वेलची घाला. आणि बारीक पावडर करून घ्या. पिठीसाखर तयार होईल.

एक कढई गरम करण्यासाठी ठेवा. गॅस मिडीयम फ्लेमवर ठेवा. नंतर त्यात २ कप रवा. घाला. रवा चमच्याने भाजून घ्या. २ मिनिटांनंतर त्यात अर्धा कप साजूक तूप घाला, आणि चमच्याने भाजून घ्या. हवं असल्यास आपण एक्स्ट्रा ३-४ चमचे तूप घालू शकता.

फुग्यासारख्या गोलगुबगुबीत झालाय चेहरा? स्वयंपाकघरातले ५ पदार्थ करतील जादू-चेहऱ्यावरची चरबी कमी होईल चटकन

रवा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या. नंतर त्यात तयार पिठीसाखर घालून भाजून घ्या. रवा भाजताना त्यात गुठळ्या होणार नाही, याची काळजी घ्या. आणि गॅस बंद करा. काही वेळानंतर भाजलेला रवा थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. आणि बारीक करून घ्या.

बारीक करून घेतलेला रवा एका परातीत काढून घ्या. जर रवा आणखीन सुटसुटीत वाटत असेल तर, त्यात आणखीन तूप घाला. आता हाताला थोडे तूप लावा, आणि थोडं मिश्रण घेऊन लाडू वळवून घ्या. अशा प्रकारे रव्याचे खुसखुशीत तोंडात विरघळणारे लाडू खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :दिवाळी 2024अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.