Lokmat Sakhi >Food > रव्याचे लाडू फसतात-कडक किंवा मऊ होतात? १ कप रव्याचे लाडू करण्याची घ्या परफेक्ट रेसिपी

रव्याचे लाडू फसतात-कडक किंवा मऊ होतात? १ कप रव्याचे लाडू करण्याची घ्या परफेक्ट रेसिपी

Rava Ladoo | Sooji Ladoo | Quick Indian Sweets : तोंडात टाकताच विरघळणारे रव्याचे लाडू करायचे? ही घ्या रेसिपी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2024 07:46 PM2024-08-01T19:46:12+5:302024-08-01T19:46:56+5:30

Rava Ladoo | Sooji Ladoo | Quick Indian Sweets : तोंडात टाकताच विरघळणारे रव्याचे लाडू करायचे? ही घ्या रेसिपी..

Rava Ladoo | Sooji Ladoo | Quick Indian Sweets | रव्याचे लाडू फसतात-कडक किंवा मऊ होतात? १ कप रव्याचे लाडू करण्याची घ्या परफेक्ट रेसिपी

रव्याचे लाडू फसतात-कडक किंवा मऊ होतात? १ कप रव्याचे लाडू करण्याची घ्या परफेक्ट रेसिपी

उन्हाळा असो किंवा पावसाळा आपण लाडू आवडीने खातो (Rava laddoo). लाडू करण्यासाठी काही विशेष सणाची किंवा साहित्याची गरज नाही. आपण कधीही घरात लाडू करू शकता (Cooking Tips). लाडू अनेक प्रकारचे केले जातात. ज्यात रव्याचे लाडू फार फेमस आहेत. इतर लाडवापेक्षा रव्याचे लाडू झटपट अगदी काही मिनिटात तयार होतात. शिवाय महिनाभरही टिकतात.

पण काहींचे रव्याचे लाडू फसतात. रवा नीट भाजला जात नाही, किंवा गुठळ्या तसेच राहतात. ज्यामुळे लाडवाची चव बिघडते. काही दिवसात लाडू खराबही होतात. जर आपल्याला तोंडात टाकताच विरघळणारे लाडू करायचे असतील तर, ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पाहा(Rava Ladoo | Sooji Ladoo | Quick Indian Sweets).

रव्याचे लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य


रवा

तूप

बच्चन कुटुंबात वाढदिवसाला करतात तो मिल्क केक असतो कसा? पाहा रेसिपी-हव्या फक्त ३ गोष्टी

बारीक चिरलेले ड्रायफ्रुट्स

मनुके

सुकं खोबरं

पाणी

वेलची पूड

कृती

सर्वात आधी कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात २ चमचे तूप घाला. तूप गरम झाल्यानंतर त्यात एक वाटी बारीक चिरलेले ड्रायफ्रुट्स घालून भाजून घ्या. नंतर त्यात अर्धी वाटी मनुके घालून भाजून घ्या. भाजलेला सुकामेवा एका वाटीमध्ये काढून घ्या.

मुलांच्या बळकट हाडांसाठी फक्त दूध पुरेसं नाही, चमचाभर ‘ही’ पावडर दुधात घाला, हाडं होतील मजबूत

नंतर त्यात २ चमचे तूप घाला. तूप गरम झाल्यानंतर त्यात १ मोठा कप रवा घालून भाजून घ्या. ४ ते ५ मिनिटांसाठी रवा तुपात भाजून घ्या. रवा भाजून झाल्यानंतर त्यात अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घालून मिक्स करा. गॅस लो फ्लेमवर ठेवा. दुसऱ्या गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यात राधी वाटी साखर आणि छोटी वाटी पाणी घालून पाक तयार करा.

तयार पाक भाजलेल्या रव्यामध्ये घालून मिक्स करा. गॅस बंद करा. मिश्रण थोडं थंड झाल्यानंतर त्यात भाजलेले ड्रायफ्रुट्स घालून मिक्स करा. त्यात अर्धा छोटा चमचा वेलची पूड घालून मिक्स करा. हाताला तूप लावा, थोडे मिश्रण घ्या व लाडू वळवून घ्या. अशाप्रकारे रव्याचे लाडू खाण्यासाठी रेडी.

Web Title: Rava Ladoo | Sooji Ladoo | Quick Indian Sweets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.