माघी गणेश जयंती साजरी करण्यासाठी घरोघरी मोदकाचा नैवद्य गणपती बाप्पाला दाखवला जातो. 'मोदक' हा गणपती बाप्पाप्रमाणेच आपल्या सगळ्यांचा देखील अतिशय आवडीचा असा पदार्थ आहे. मोदक (Maghi Ganesh Jayanti Special How To Make Rava Modak) असं नुसतं नाव जरी घेतलं तरी घरातील प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. उकडीचे मोदक करायचे म्हटलं की खूप मोठा घाट घालावा लागतो. यासोबतच, उकडीचे मोदक करणे ही एक प्रकारची कलाच आहे. सगळ्यांनाच उकडीचे मोदक अगदी परफेक्ट जमतीलच असे नाही(Rava Modak Recipe).
यासाठी यंदाच्या माघी गणेश जयंतीला कपभर रव्याचे (Instant Rava Modak Recipe) झटपट होतील असे इन्स्टंट 'रवा मोदक' घरच्याघरीच करू शकता. आपण घरी असणाऱ्या मोजक्याच साहित्याचा वापर करून झटपट तयार होणारे, दीर्घकाळ टिकणारे रव्याचे मोदक तयार करु शकता. झटपट होणाऱ्या रव्याच्या मोदकांची रेसिपी पाहूयात(Semolina Modak Recipe).
साहित्य :-
१. साजूक तूप - २ ते ३ टेबलस्पून
२. ओलं खोबरं - १ कप (किसलेलं)
३. गूळ - १ कप ( किसलेला)
४. रवा - १ कप
५. दूध - २ कप
६. साखर - २ कप
७. वेलची पूड - १/२ टेबलस्पून
८. मीठ - चवीनुसार
पाहा झटपट कणीक मळण्याची भन्नाट युक्ती, वेळही कमी लागतो, कणिकही होते मऊसूत...
दीपिका पादुकोणला आवडतो तसा ‘रस्सम राइस’ करायचाय? ही घ्या स्पेशल साऊथ इंडियन रेसिपी...
कृती :-
१. सगळ्यात आधी मोदकाचे सारण तयार करुन घेण्यासाठी एका मोठ्या पॅनमध्ये साजूक तूप घेऊन त्यात किसलेलं ओलं खोबरं आणि गूळ, वेलची पूड घालूंन घ्यावी.
२. आता सगळे जिन्नस एकत्रित करून त्याचे सारण तयार करून घ्यावे. सारण तयार करुन झाल्यावर ते थोडे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यावे.
३. आता मोदकाची पारी तयार करण्यासाठी सर्वात आधी एका पॅनमध्ये थोडे तूप घालूंन मग रवा घालावा. रवा तुपावर थोडासा भाजून घ्यावा.
४ भाजून झाल्यावर रव्यात दूध घालून थोडेसे आटवून घट्ट कणकेसारखा गोळा तयार करून घ्यावा.
५. त्यानंतर रव्यात साखर व वेलची पूड आणि थोडे साजूक तूप घालावे.
६. मोदकाच्या साच्याचा वापर करुन रव्याच्या पिठाचे छोटे छोटे गोळे करुन या साच्यात घालावेत. त्यानंतर, हलकेच हाताने दाब देत मोदक आतून खोलगट करून घ्यावा. त्यानंतर त्यात खोबऱ्याचे सारण घालावे. सगळ्यात शेवटी तळाशी रव्याची छोटीशी पारी तयार करून मोदकाला आकार द्यावा.
७. आता मोदक अलगद साच्यातून काढून घ्यावा.
रव्याचा मोदक खाण्यासाठी तयार आहे. माघी गणेश जयंती निमित्त आपण घरच्याघरीच असे रव्याचे इन्स्टंट मोदक झटपट तयार करु शकता.