Join us  

डाळ-तांदूळ न भिजवता, कपभर रव्याचे करा इन्स्टंट ताकातले अप्पे..चवीला भारी-बनतील १० मिनिटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2024 11:29 AM

Rava Paniyaram Recipe | Instant Sooji Appe : गुबगुबीत फुललेले रव्याचे अप्पे करण्याची सोपी कृती, नाश्ता होईल मस्त पोटभर..

दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांच्या शौकीन लोकांनी आप्पे (Rava Appe) चाखलेच असतील. इडली, डोशाप्रमाणेच अप्पे खाण्याचा खवय्यावर्ग मोठा आहे. डाळ - तांदूळ भिजत घालून आपण चविष्ट अप्पे तयार करतोच. पण जर डाळ-तांदूळ न भिजवता, किंवा डाळ-तांदुळाचं बॅटर रेडी नसेल तर, तर झटपट तयार होणारे रव्याचे अप्पे करून पाहा. रव्याचे अप्पे करताना फार वेळ लागत नाही, शिवाय कमी साहित्यात रव्याचे अप्पे तयार होतात.

बऱ्याचदा लहान मुलं भाजी खाताना खूप नाटकी करतात, डब्याला भाज्या घेऊन जात नाही (Cooking Tips). जर मुलं भाजी खाताना नाकं मुरडत असतील तर, त्यांच्यासाठी खास रव्याचे अप्पे तयार करा. पौष्टीक अशी ही रेसिपी काही मिनिटात तयार होते. शिवाय लहानग्यांपासून थोरामोठ्यांना ही रेसिपी नक्कीच आवडेल(Rava Paniyaram Recipe | Instant Sooji Appe).

रव्याचे अप्पे करण्यासाठी लागणारं साहित्य

रवा

ताक

मीठ

गाजर

फरसबी

बसून-बसून पोट वाढलं-कंबरेचा घेर सुटलाय? आहारात रोज खा ५ मसाले, पोट होईल सपाट

मक्याचे दाणे

कांदा

टोमॅटो

हिरवी मिरची

कोथिंबीर

इनो

तेल

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये २ कप रवा, एक कप ताक आणि चिमुटभर मीठ घालून मिक्स करा. त्यावर १० मिनिटांसाठी झाकण ठेवा. १० मिनिटानंतर त्यात किसलेला गाजर, बारीक चिरलेली फरसबी, मक्याचे दाणे, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून मिक्स करा.

कांदवणी हा पारंपरिक पदार्थ तुम्ही खाल्ला आहे का? ५ मिनिटांत करा चमचमीत भाजी

दुसरीकडे अप्पे पात्रात थोडे तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. नंतर बॅटरमध्ये चमचाभर इनो घालून मिक्स करा. भांडं गरम झाल्यानंतर त्यात रव्याचं बॅटर चमच्याने घाला, व त्यावर २ मिनिटांसाठी झाकण ठेवा. २ मिनिटानंतर झाकण काढा, व अप्पे दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. अशा प्रकारे रव्याचे अप्पे खाण्यासाठी रेडी. आपण हे रव्याचे अप्पे आपल्या फेवरीट चटणीसोबत खाऊ शकता.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स