उन्हाळ्याच्या दिवसात पापडं, कुरडया करायला घरोघरी सुरूवात होते. उन्हाळ्याच्या दिवसात केलेले पापड वर्षभर कधीही खाता येतात. पापड करायचे म्हटलं की खूप वेळ द्यावा लागतो. पीठ तयार करा, पापड लाटा ते कडक सुर्यप्रकाशात सुकवा. असे उद्योग करणं अनेकींना नको वाटतं. (How to make rawa papad)
कारण रोजची कामचं उरकत नाहीत. त्यात पापडं बनवयाचं म्हणलं की खूपच वेळ जाणार म्हणून बरेच लोक बाहेरून पापड आणून खातात. (How to Make Rava Papad) घरी बनवलेल्या पदार्थांची चव काही वेगळीच असते. रव्याचे पापड करायला तुम्हाला जराही वेळ लागणार नाही अगदी कमीत कमी खर्चात तुम्ही हे पापड बनवू शकता. (How to make Papad at home)
रव्याचे पापड कसे बनवायचे?
१ मोठी वाटी भरून बारीक रवा घ्या. नेहमी बारीक रवा पापडांसाठी वापरा. साधारण अर्धा किलो रवा घ्या. ज्या भांड्यात तुम्ही रवा घेतला त्याच भांड्यात ८ वेळा पाणी घेऊन एका मोठ्या भांड्यात गरम करायला ठेवा. यात २ चमचे तेल, चवीनुसार मीठ, २ चमचे ृपापड खार आणि जीरं घाला. पापड खार घातल्यानं पापड मस्त हलके फुलके आणि कुरकुरीत होतात. पाणी गरम झाल्यानंतर त्यात रवा घाला. पाणी जास्त उकळवू नका त्या आधीच रवा घाला अन्यथा रव्याच्या गुठळ्या होतात. (How to Make Rava Papad, Easy Method cooking tips)
एका हातानं रवा घाला आणि दुसऱ्या हातानं ढवळत राहा. रव्याच्या गुठळ्या पाण्यात राहणार नाही याची काळजी घ्या. पाण्यात रवा व्यवस्थित एकजीव करून घ्या. हे मिश्रण घट्ट होईपर्यंत मंच आचेवर शिजवत राहा. तर मोठ्या आचेवर शिजवत असाल तर सतत ढवळत राहा नाहीतर रव्याचं मिश्रण भांड्याला खाली चिकटू शकतं.
विकतसारखी गोलगोल, क्रिस्पी मुग भजी घरीच करा; ना सोडा, ना कॉर्नफ्लोर, एकदम हेल्दी रेसेपी
२५ ते ३० मिनिटं मिश्रण शिजवल्यानंतर मिश्रण घट्ट होईल. मिश्रण घट्ट झाल्यानंतर त्यात 5 ते ६ चमचे पांढरे तीळ, दोन चमचे जीरं, दोन चमचे ओवा घालून मिश्रण ढवळून घ्या आणि गॅस बंद करा हे मिश्रण जास्त थंड होऊ देऊ नका. गरम असतानाच पापड करा.
बिना कांदा-लसणाचं चवदार वाटणं; एकदाच करा; आठवडाभर कोणत्याही भाजीसाठी वापरा
एका प्लास्टीकच्या कागदावर मध्यम आकाराचे पळी पापड घाला. हे पापड २ ते ३ दिवस कडक उन्हात सुकवून घ्या. थोडे सुकल्यानंतर पापड उलटे करून घ्या आणि सुकवायला ठेवा. घरातही फॅनच्या हवेखाली ४ ते ५ तासात हे पापड सुकतात. नंतर हवंतर एका मोठ्या सुपात किंवा डब्यात भरून हा डबा २ ते ३ दिवस उन्हात ठेवू शकता. नंतर हे पापड तेल कडक गरम करून त्यात तळून घ्या. तयार आहेत रव्याचे कुरकुरीत, चवदार पापड.