नाश्ता हा दिवसभरातील महत्वाचा आहार आहे. सकाळचा नाश्ता हा हेल्दी पदार्थांनी केल्याने, दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. ज्यामुळे आपण तंदुरुस्त आणि फिट राहतो. नाश्ता म्हटलं की आपण पोहे आणि उपमा खातो. काही वेळेला साऊथ इंडियन पदार्थ देखील चवीने खातो. इडली, डोसा, मेदू वडा, अप्पे, आणि उत्तप्पा हे पदार्थ आवडीने खाल्ले जातात. मात्र, साऊथ इंडियन पदार्थ करण्याची प्रोसेस खूप मोठी आहे.
इडली, डोसा आपण नेहमीच खातो, त्याजागी आपण इन्स्टंट रव्याचा उत्तप्पा ट्राय करून पाहू शकता. रव्याचा उत्तप्पा करण्यासाठी डाळी - तांदूळ भिजत घालण्याची गरज नाही. कपभर रव्यात इन्स्टंट उत्तप्पा रेडी होतो. रव्याचा उत्तप्पा आपण नाश्त्यामध्ये तर खाऊच शकता, सोबत मुलांना टिफिनमध्ये देखील देऊ शकता(Rava uttapam recipe | instant suji uttapam recipe).
इन्स्टंट रव्याचा उत्तप्पा करण्यासाठी लागणारं साहित्य
रवा
दही
पाणी
कांदा
सिमला मिरची
कोथिंबीर
आलं
दही खाणं चांगलं की ताक पिणं उत्तम? दही कुणी खावं आणि ताक कुणी प्यावं या प्रश्नाचं उत्तरं..
गाजर
तेल
कृती
सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये एक कप रवा घ्या, त्यात एक कप दही, व अर्धा कप पाणी घालून साहित्य एकजीव करा. नंतर त्यात एक चमचा मीठ, एक चमचा काळी मिरी पावडर आणि चिमुटभर बेकिंग सोडा घालून मिक्स करा. व त्यावर १५ मिनिटे झाकण ठेऊन द्या.
दुसऱ्या बाऊलमध्ये एक बारीक चिरलेला कांदा, सिमला मिरची, कोथिंबीर आणि आलं घेऊन मिक्स करा. व चिरलेल्या भाज्या बॅटरमध्ये मिक्स करा. नंतर त्यात एक कप किसलेला गाजर घालून मिक्स करा.
नॉन स्टिक पॅन गरम करण्यासाठी ठेवा. गॅस मध्यम आचेवर ठेवा. पॅन गरम झाल्यानंतर त्यावर ब्रशने तेल लावून ग्रीस करा. व चमच्याने बॅटर पॅनवर पसरवा. मात्र, बॅटर पॅनवर जास्त पसरवू नका. कारण उत्तप्पा हा आकाराने गोल आणि जाडसर असतो. बॅटर पसरवल्यानंतर त्यावर झाकण ठेवा. व दोन्ही बाजूने उत्तप्पा खरपूस भाजून घ्या. अशा प्रकारे इन्स्टंट रव्याचा उत्तप्पा खाण्यासाठी रेडी. हा उत्तप्पा आपण खोबऱ्याची चटणी किंवा सांबारसोबत खाऊ शकता.