वडा या पदार्थाचा खवय्यावर्ग खूप मोठा आहे. लोकांना बटाटा वडा, सांबार वडा, डाळ वडा, दही वडा खायला प्रचंड आवडते. नाश्त्याला साऊथ इंडियन पदार्थ लोकं आवडीने खातात. मेदू वडा ही रेसिपी अनेकांना आवडते. पण ही रेसिपी करायला खूप कठीण आहे. आपल्याला देखील डाळी भिजत घालून, वाटण तयार करून वडे करण्याचा कंटाळा आला असेल तर, रव्याचे वडे ही रेसिपी ट्राय करून पाहा.
रव्याचे वडे ही रेसिपी कमी साहित्यात - झटपट तयार होते. लहानग्यांपासून थोरा - मोठ्यांना ही रेसिपी नक्की आवडेल. काही दिवसात शाळा सुरु होतील, मुलांच्या डब्यासाठी ही रेसिपी बेस्ट ऑप्शन ठरू शकते. चला तर मग या हटके पदार्थाची कुरकुरीत कृती पाहूयात(rava vada recipe | instant rava medu vada | suji vada).
रव्याचा मेदू वडा करण्यासाठी लागणारं साहित्य
दोन वाट्या रवा
एक वाटी दही
एक टीस्पून चिरलेली हिरवी मिरची
एक टीस्पून किसलेलं आलं
मस्त घट्ट कवडी दही लावण्यासाठी १ खास टिप, दह्याला पाणी सुटणार नाही..
काळी मिरी पावडर
चिमूटभर हिंग
चिरलेली कोथिंबीर
चिरलेला कढीपत्ता
बेकिंग सोडा
तेल
पाणी
चवीनुसार मीठ
कृती
सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये २ कप रवा घ्या, त्यात एक कप फेटलेलं दही घालून मिश्रण मिक्स करा. त्यात थोडं पाणी घाला व मिश्रण एकजीव करा. आपल्याला बॅटर पातळ ठेवायचे नाही आहे. ज्याप्रमाणे मेदू वडासाठी पीठ जाड ठेवतो, त्याचप्रमाणे पीठ जाडसर ठेवायचे आहे. आता त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. व त्यावर १० मिनिटांसाठी झाकण ठेऊन द्या.
१० मिनिटानंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, काळी मिरी पावडर, हिंग, बारीक चिरलेला कडीपत्ता, कोथिंबीर, बेकिंग सोडा, घालून साहित्य बॅटरमध्ये एकजीव करा. अशा प्रकारे बॅटर रेडी झालेलं आहे. आता हाताला तेलाने ग्रीस करा, व रव्याच्या वड्याला मेदू वडा सारखा आकार द्या.
कोबीचे कबाब!-खरं नाही वाटत ना, पण कोबीचे खमंग कुरकुरीत कबाब करायला सोपे आणि चविष्ट
दुसरीकडे कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर हे वडे गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्या. अशा प्रकारे रव्याचे मेदू वडे खाण्यासाठी रेडी.