सायंकाळची छोटी भूक लागल्यावर काय करावं सुचत नाही (Rava Vada). आशावेळी आपण उलट सुलट पदार्थ खातो. किंवा चहा पितो. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. चहासोबत काहीतरी हटके खाण्याची इच्छा प्रत्येकाचीच होते (Cooking Tips). अशावेळी वडा, भजी घरात आपण करतोच. पण जर घरात भाजी किंवा बेसन नसेल तर, आपण रव्याचे देखील वडे करू शकता (Food).
कपभर रव्याचे भरपूर वडे तयार होतात, शिवाय कमी वेळात तयार होतात. जर आपल्याला हटके आणि स्वादिष्ट काहीतरी खाण्याची इच्छा होत असेल तर, झटपट रव्याचे कुरकुरीत वडे करून पाहा. नाश्ता आणि टिफिनसाठी ही परफेक्ट रेसिपी आहे(Rava Vada Recipe (Instant Suji Vada)).
रव्याचे कुरकुरीत वडे करण्यासाठी लागणारं साहित्य
रवा
पाणी
आलं
गळणारे केस आणि कोरड्या त्वचेवर 'एकच' उपाय; चवीला उत्तम आणि पोटभरीचा ‘असा’ मस्त उपाय
जिरं
लसणाची पेस्ट
मीठ
हिरवी मिरची
कोथिंबीर
कृती
सर्वात आधी कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात २ ग्लास पाणी घाला. पाणी गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा किसलेलं आलं, एक चमचा जिरं, लसणाची पेस्ट, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून मिक्स करा.
गव्हाची पोळी रोजच खातो, आता त्यात ' या ' ४ पैकी १ पदार्थ मिसळा; हाडे होतील बळकट
पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात एक ग्लास रवा घालून मिक्स करा, आणि गॅस मध्यम आचेवर ठेवा. त्यावर ५ मिनिटांसाठी झाकण ठेवा. नंतर गॅस बंद करा, व मिश्रण एका परातीत काढून घ्या, व हाताला थोडे तेल लावून मळून घ्या, व हातावर थोडे मिश्रण घेऊन मेदू वड्याचा आकार द्या.
दुसरीकडे कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात मेदू वडे सोडून दोन्ही बाजूने तळून घ्या. तळताना गॅस मध्यम आचेवर ठेवा. जेणेकरून वडे छान तळले जातील, आणि कुरकुरीत होतील. अशा प्रकारे रव्याचे कुरकुरीत वडे खाण्यासाठी रेडी.