Lokmat Sakhi >Food > तोंडी लावण्यासाठी ५ मिनिटांत करा कच्च्या कैरीची चटपटीत चटणी; सोपी रेसिपी, खायला भारी

तोंडी लावण्यासाठी ५ मिनिटांत करा कच्च्या कैरीची चटपटीत चटणी; सोपी रेसिपी, खायला भारी

Raw Mango Chutney Green Mango Chutney : सध्या बाजारात ताज्या, हिरव्यागार कैऱ्या दिसायला सुरूवात झाली आहे. कैरीची भाजी किंवा कैरीची चटणी तुम्ही आहारात समाविष्ट करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 11:47 AM2023-04-14T11:47:43+5:302023-04-14T15:32:57+5:30

Raw Mango Chutney Green Mango Chutney : सध्या बाजारात ताज्या, हिरव्यागार कैऱ्या दिसायला सुरूवात झाली आहे. कैरीची भाजी किंवा कैरीची चटणी तुम्ही आहारात समाविष्ट करू शकता.

Raw Mango Chutney Green Mango Chutney : How to make row mango chutney | तोंडी लावण्यासाठी ५ मिनिटांत करा कच्च्या कैरीची चटपटीत चटणी; सोपी रेसिपी, खायला भारी

तोंडी लावण्यासाठी ५ मिनिटांत करा कच्च्या कैरीची चटपटीत चटणी; सोपी रेसिपी, खायला भारी

जेवणाना तोंडी लावणीसाठी चटणी, लोणचं असे पदार्थ असतील जेवणाची मजाच काही वेगळी असते. रोजच्या जेवणात आवडती भाजी किंवा त्याच त्याच चवीच्या भाज्या असल्या की जेवणाची अजिबात इच्छा होत नाही. जर जेवणात वेगवेगळे पदार्थ असतील खाण्याची मजाच काही वेगळी असते. (How to make row mango chutney)

सध्या बाजारात ताज्या, हिरव्यागार कैऱ्या दिसायला सुरूवात झाली आहे. कैरीची भाजी किंवा कैरीची चटणी तुम्ही आहारात समाविष्ट करू शकता. तेव्हढाच जेवणात बदल होतो. (Raw Mango Chutney  Green Mango Chutney ) कच्च्या कैरीच्या चटणीची सोपी रेसेपी पाहूया.कैरीची चटणी बनण्यासाठी सगळ्यात आधी मध्यम आकाराची कैरी घेऊन स्वच्छ धुवून घ्या आणि सालं काढून घ्या. नंतर कैरीचे लहान लहान काप करा.  कैरीचं लोणचं, पन्ह बनवायला बराचवेळ लागत असला तरी  ही कैरीची चटणी  ५ मिनिटात तयार होईल.

मिक्सरमध्ये कैरी आणि गुळाचे काप, २ चमचे डेसिकेटेड कोकोनट आणि ३ ते ४ लसूण, ३ ते ४ कढीपत्त्याची पानं घाला. थोडं पाणी घालून हे मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्या. नंतर त्यावर  मोहोरी, जीऱ्याची फोडणी घाला आणि फोडणी कैरीच्या मिश्रणासह एकत्र करून घ्या. तयार आहे झणझणीत, चवदार कैरीची चटणी

कैरी खाण्याचे फायदे

- उन्हाळ्यात जड अन्न खाल्ल्यामुळे लोकांना एसिडिटी, पोटदुखी, बद्धकोष्ठता अशा समस्या उद्भवतात. अशा स्थितीत कच्ची कैरी खाल्ल्यास एसिडिटीची तक्रार दूर होईल, कारण त्याचा आहारात समावेश केल्याने अन्न सहज पचते.

- कैरी तुमच्या त्वचेसाठी वरदान आहे कारण त्यात व्हिटॅमिन सी असते, जे मुरुम यांसारख्या तक्रारी दूर ठेवते आणि तुम्हाला निरोगी आणि चमकदार त्वचा देते.

- कोशिंबीर, चटणीमध्ये कच्चा आंबा खाल्ल्याने तुमचे वजन कमी होण्यास मदत होते. यामध्ये आढळणारे फायबर्स शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. 

Web Title: Raw Mango Chutney Green Mango Chutney : How to make row mango chutney

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.