Join us  

बाजारात ताज्या ताज्या कैऱ्या आल्या, करा कैरीची आंबटगोड चटणी; जेवा मनसोक्त-तोंडाला येईल चव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 11:19 AM

Raw Mango Chutney : कैरीची चटपटीत चटणी तोंडी लावणाीसाठी केली तर जेवणाची रंगत वाढते इतकंच नाही तर कितीही साधा स्वयंपाक असेल तरी तुम्ही जेवण लगेच फस्त कराल.

उन्हाळा सुरू झाल्यानंतर बाजारात  कच्च्या कैऱ्या दिसायला सुरूवात होते. आंबे ज्याप्रकारे आवडीनं खाल्ले जातात त्याचप्रमाणे कैरीचाही इतर पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी वापर केला जातो. (Raw Mango Chutney) कोणी भाजीत तर कोणी डाळीत कैरी घालतं तर काहीजण कच्च्या कैरीच्या फोडी करून त्यावर तिखट, मीठ लावून  खातात. कैरीची चटपटीत चटणी तोंडी लावणाीसाठी केली तर जेवणाची रंगत वाढते इतकंच नाही तर कितीही साधा स्वयंपाक असेल तरी तुम्ही जेवण लगेच फस्त कराल. कैरीची चटणी बनवण्याची सोपी  पद्धत पाहूया. (Instant Raw Mango Chutney Recipe)

कच्च्या कैरीची चटणी बनवण्याचं साहित्य

२ टेबलस्पून तेल ,1/4 टीस्पून मेथी दाणे, 1/2 टीस्पून जिरे ,1 टीस्पून एका जातीची बडीशेप, 1/8 टीस्पून हिंग, 1 आंबा, किसलेले 1/2 टीस्पून मीठ, 1/8 टीस्पून हळद,1 कप गूळ, 1 कप पाणी, 2 टीस्पून लाल तिखट,  5 लवंगा ,  टीस्पून आले पावडर

कृती

१) कढईत तेल घेऊन त्यात मेथी, जिरे, बडीशेप आणि हिंग टाका. ते तळून त्यात वाटलेल्या कैरीचं मिश्रण घाला.

२) आता त्यात मीठ, हळद, पावडर गूळ घालून मिक्स करा.

३) थोडे पाणी घालून मिक्स करावे.

४) आता त्यात काही लाल मिरच्या, ठेचलेल्या लवंगा आणि आल्याची पूड घालून मिक्स करा. तयार आहे कैरीची चटपटीत चटणी

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स