Lokmat Sakhi >Food > ताज्या-ताज्या कैऱ्यांची करा मस्त भाजी! कैरीचं लोणचं-रायतं-चटणी तर नेहमीची, ही भाजी खाऊन पाहा..

ताज्या-ताज्या कैऱ्यांची करा मस्त भाजी! कैरीचं लोणचं-रायतं-चटणी तर नेहमीची, ही भाजी खाऊन पाहा..

Raw Mango Sabzi recipe : चविष्ट, चवदार भाजी.अशी चमचमीत भाजी उन्हाळ्यात खाण्याची मजाच और.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 12:07 PM2023-03-03T12:07:45+5:302023-03-03T14:22:51+5:30

Raw Mango Sabzi recipe : चविष्ट, चवदार भाजी.अशी चमचमीत भाजी उन्हाळ्यात खाण्याची मजाच और.

Raw Mango Sabzi recipe : How to make row mango sabzi Raw Mango Curry Recipe | ताज्या-ताज्या कैऱ्यांची करा मस्त भाजी! कैरीचं लोणचं-रायतं-चटणी तर नेहमीची, ही भाजी खाऊन पाहा..

ताज्या-ताज्या कैऱ्यांची करा मस्त भाजी! कैरीचं लोणचं-रायतं-चटणी तर नेहमीची, ही भाजी खाऊन पाहा..

उन्हाळा सुरू होताच बाजारात कैऱ्या दिसायला सुरूवात होते. कैऱ्या वापरून कोणतेही पदार्थ बनवण्यास अगदी कमीत कमी वेळ लागतो. (Raw Mango Curry Recipe) जेवणात रोज त्याच त्या भाज्या खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही या उन्हाळ्यात चटपटीत तितकीच आंबट गोड चवीची कैऱ्यांची भाजी ट्राय करू शकता. बााजारात फ्रेश, हिरव्यागार कैऱ्या दिसायला सुरूवात झाली आहे. या कैऱ्या वापरून तुम्ही चविष्ट, चवदार भाजी बनवू शकता.जी भाकरी, चपाती किंवा भातासह खाऊ शकता. (How to make row mango sabzi)

कैरीची भाजी कशी बनवायची?

२५० ग्रॅम कैरी

२ टिस्पून लाल तिखट

१ टिस्पून हळद

१ टीस्पून हिंग

१/४ टीस्पून शोप

२ टीस्पून धने

१ टीस्पून मोहोरी

६ ते ७ लसूण कळ्या

अर्धा कप गूळ 

३ ते ४ टिस्पून तेल

२ चमचे मीठ

कृती

1) कैरीची भाजी  करण्यासाठी सगळ्यात आधी कैरी स्वच्छ धुवून त्याचे काप करून घ्या.

2) धणे, जीरं,जाडसर भरड करून घ्या. लसूणही वाटून घ्या

3) कढईत तेल गरम करून तेलात मोहरी जीरे घाला हे तडतडले कि हिंग घाला.

4) त्यात धणे, जीरं भरड, तिखट,हळद,लसूण घालून परतून घ्या. 

5) नंतर कैरीच्या फोडी घालून मिश्रण एकत्र करा.

6) मीठ घालून ८ ते १० मिनिटं भाजी शिजवून घ्या आणि गॅस बंद करा. तयार आहे कैरीची आंबट गोड भाजी
 

Web Title: Raw Mango Sabzi recipe : How to make row mango sabzi Raw Mango Curry Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.