आंबा हा उन्हाळ्यातील सर्वात लोकप्रिय व स्वादिष्ट फळांपैकी एक आहे. आंबा असो वा कच्ची कैरी उन्हाळ्यात जेवण त्याच्याशिवाय अपूर्ण वाटते. कैरी म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. कच्च्या कैरीचे अनेक पदार्थ केले जातात. कैरीचं लोणचं, कैरीचे पन्हे, कैरीचा मुखवास, कैरीचा मुरंबा, कैरीची चटणी हे पदार्थ जेवणाची रंगत वाढवतात.
पण आपण कधी कैरीची चटपटीत शेव खाल्ली आहे का? शेव अनेक प्रकारचे केले जातात. पण कैरीची शेव क्वचितच लोकांनी खाल्ली असेल. जर आपल्याला कैरीचे तेच - तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर, नक्कीच कैरीची शेव ही हटके रेसिपी ट्राय करून पाहा. चमचमीत पदार्थ सायंकाळच्या चहासोबत खाण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे(Raw Mango Sev Recipe, How to make raw mango sev).
कैरीची चटकदार शेव करण्यासाठी लागणारं साहित्य
कैरी
पाणी
कोथिंबीर
पुदिन्याची पानं
२ ब्रेडच्या स्लाइस-१ कपभर दूध, करा पोटभरीचं गारेगार डेझर्ट! गोड खाण्याची चंगळ
हिरव्या मिरच्या
ग्रीन फूड कलर
बेसन
जिरं पावडर
तांदळाचं पीठ
मीठ
तेल
अशा पद्धतीने करा कैरीची शेव
सर्वप्रथम, कैरी स्वच्छ धुवून घ्या, व त्याची साल काढून बारीक चिरून घ्या. बारीक चिरलेली कैरी मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. त्यात थोडं पाणी घालून त्याची पेस्ट तयार करा. पेस्ट तयार झाल्यानंतर त्यात कोथिंबीर, पुदिण्याची पानं व हिरव्या मिरच्या घालून पुन्हा मिश्रण बारीक करून घ्या.
मिश्रणाची पेस्ट तयार झाल्यानंतर चाळणीतून गाळून घ्या, व ही पेस्ट एका बाऊलमध्ये काढा. आता त्यात एक चमचा खायचा हिरवा रंग घालून एकजीव करा. त्यात एक कप बेसन व २ चमचे जिरे पावडर, चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्यात एक चमचा तेल, एक चमचा तांदळाचं पीठ घालून मिश्रण पुन्हा मिक्स करा.
पालक चिरून नाहीतर अख्ख्या पानांची करा कुरकुरीत भजी, कमी तेल पिणारी भजी, खवय्यांना नक्की आवडेल..
आता एक सॅटिनचा कापड व एक वाटी घ्या. सॅटिनच्या कापडाला गरम सुईच्या मदतीने छोटी छिद्रे पाडून घ्या. छिद्रे पाडून झाल्यानंतर कापडावर ब्रशने तेल लावा, व कापड वाटीवर ठेवा. त्यात कैरीचे तयार मिश्रण घालून एक गाठ बांधून घ्या, जेणेकरून पीठ बाहेर येणार नाही.
दुसरीकडे तेल गरम करण्यासाठी ठेवा, तेल गरम झाल्यानंतर तयार पीठाचे शेव पाडून घ्या. व खरपूस तळून घ्या. अशा प्रकारे क्रिस्पी कैरीची शेव खाण्यासाठी रेडी, आपण ही शेव हवाबंद डब्यात झाकून ठेऊ शकता. ही शेव महिनाभर टिकेल.