हिवाळ्यात आपल्याला भरपूर जेवण जातं. खाल्लेलं सगळं व्यवस्थित अंगी लागतं. त्यामुळे तब्येत सुधारते. त्याउलट उन्हाळ्याचं असतं. उन्हाळ्याच्या दिवसांत आहार खूप कमी झालेला असतो. कारण उन्हामुळे एवढा त्रास होतो की जेवण जात नाही. त्यामुळे अशक्तपणा जाणवतो. काही जणांना तर पाणी कमी प्यायल्याने डिहायड्रेशन होण्याचाही धोका असतो. त्यामुळे उन्हाळ्यात जेवण गेलं नाही तरी शरीराला थंडावा देणारे घरगुती सरबतं सतत घेत राहावेत, असा सल्ला डाॅक्टरही देत असतात. आता या दिवसांत सगळ्यात जास्त भाव खाऊन जाते ती कैरी आणि तिच्यापासून तयार केलेलं पन्हं..(raw mango sharbat recipe) तुम्हाला पन्हं करण्याचं काम खूप किचकट आणि वेळखाऊ वाटत असेल (kairicha panha recipe in Marathi) तर ही एक अगदी सोपी रेसिपी पाहून घ्या..(how to make kairicha panha?)
कैरीचं पन्हं करण्याची रेसिपी
साहित्य
१ मध्यम आकाराची कैरी
साखर आणि गूळ मिळून अर्धी वाटी
नेहमीचंच वरण किंवा आमटी होईल आणखी चवदार, १ सोपी ट्रिक- फोडणी झाल्यानंतर लगेच....
२ ते ३ टीस्पून मीठ
१ टीस्पून काळं मीठ
१ टीस्पून वेलची पावडर
कृती
सगळ्यात आधी कैरी स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर तिचा देठाकडचा भाग काढून टाका.
आता कैरीची सालं काढून घ्या. आणि ती कुकरच्या डब्यात घाला. डब्यात थोडंसं पाणी टाका आणि मध्यम आचेवर दोन ते तीन शिट्ट्या होईपर्यंत कैरी उकडून घ्या.
रोज नेमाने चालायला गेलं म्हणजे व्यायाम झाला असं तुम्हाला वाटतं? बघा तज्ज्ञ काय सांगतात
यानंतर वाफवून घेतलेली कैरी थंड होऊ द्या. त्यानंतर तिचे बारीक काप करा आणि मिक्सरच्या भांड्यात टाका.
याचवेळी कैरीसोबत गूळ आणि साखरसुद्धा टाकावी. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नुसतं गुळाचं किंवा नुसतं साखरेचं पन्हंसुद्धा करू शकता. किंवा गूळ- साखर सम प्रमाणात घालूनही सरबत करू शकता.
आता मिक्सरमधून जे मिश्रण फिरवलं आहे ते एका भांड्यात काढून घ्या. जेवढं ते मिश्रण असेल त्याच्या दुप्पट पाणी घाला. पाणी घालताना एकदम घालू नये.
लग्नकार्यात अंगावर हवीच ठसठशीत 'टेम्पल ज्वेलरी', बघतच राहावे असे ८ सुंदर प्रकार
हळूहळू पन्ह्याची चव घेत पाणी घालावं. नाहीतर पाणी जास्त होऊन पन्हं पांचट होऊ शकतं. गोड आणि आंबट या दोन्ही चवी जेव्हा त्यात व्यवस्थित साधल्या जातात तेव्हाच ते पन्हं चवदार होतं.