Lokmat Sakhi >Food > हिवाळा स्पेशल : केलं की नाही ओल्या हळदीचं चटपटीत लोणचं? जेवणात रंगत आणणारी पारंपरिक रेसिपी, ५ फायदे

हिवाळा स्पेशल : केलं की नाही ओल्या हळदीचं चटपटीत लोणचं? जेवणात रंगत आणणारी पारंपरिक रेसिपी, ५ फायदे

Winter Special Raw Turmeric Pickle Recipe and Benefits : हे लोणचे झटपट होणारे असून आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर असते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2022 01:04 PM2022-12-11T13:04:06+5:302022-12-11T13:23:04+5:30

Winter Special Raw Turmeric Pickle Recipe and Benefits : हे लोणचे झटपट होणारे असून आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर असते.

Raw Turmeric Pickle Recipe and Benefits : Winter special Done Raw turmeric pickle? A traditional recipe that adds color to food, 5 benefits | हिवाळा स्पेशल : केलं की नाही ओल्या हळदीचं चटपटीत लोणचं? जेवणात रंगत आणणारी पारंपरिक रेसिपी, ५ फायदे

हिवाळा स्पेशल : केलं की नाही ओल्या हळदीचं चटपटीत लोणचं? जेवणात रंगत आणणारी पारंपरिक रेसिपी, ५ फायदे

Highlightsहाडांच्या दुखण्यावरही ही हळद खाल्ल्यास त्रास कमी होण्याची शक्यता असते. जेवणाची रंगत वाढवणारी आरोग्यदायी रेसिपी...

हिवाळ्याच्या दिवसांत थंडीमुळे आपल्याला भरपूर भूक लागते आणि खाल्लेले चांगले पचतेही. या काळात सतत गरमागरम आणि चमचमीत काहीतरी खावंसं वाटतं. जेवणाची रंगत वाढवण्यासाठी आपल्याकडे डाव्या बाजूला लोणचं, चटणी, कोशिंबीर असतंच. आहार चौरस असावा यासाठी हे सगळं आवश्यक असतंच पण जेवणाची रंगत वाढावी यासाठीही लोणचं आणि चटण्या आवर्जून केल्या जातात. इतकंच नाही तर हे पदार्थ आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर असतात. उन्हाळ्याच्या दिवसांत आपण ज्याप्रमाणे कैरीचे, मिरच्या आणि लिंबाचे लोणचे घालतो त्याचप्रमाणे थंडीच्या दिवसांत आवळा, ओली हळद किंवा आंबेहळद यांचे पूर्वी आवर्जून केले जायचे. पारंपरिक पद्धतीने केले जाणारे हे लोणचे झटपट होणारे असून आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर असते. पाहूयात या लोणच्याची सोपी रेसिपी आणि ओली हळद खाण्याचे फायदे (Winter Special Raw Turmeric Pickle Recipe and Benefits).

(Image : Google)
(Image : Google)

रेसिपी 

साहित्य -

१. ओली हळद - पाव किलो 

२. आलं - १ चमचा 

३. मोहरीची पावडर - २ चमचे 

४. तिखट - अर्धा चमचा 

५. साखर - १ चमचा 

६. मीठ - चवीनुसार 

७. लिंबाचा रस - १ चमचा 

८. तेल - पाव वाटी 

९. जीरे - अर्धा चमचा 

१०. हिंग - पाव चमचा 

कृती - 

१. हळद आणि आलं स्वच्छ धुवून कोरडं करुन किसून घ्या. 

२. मिक्सरवर मोहरीची पूड करुन ती तेलामध्ये चांगली फेटून घ्या.

३. किसलेली हळद आणि आलं यांमध्ये मीठ, साखर, तिखट आणि लिंबाचा रस घालून घ्या.

४. कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये जीरं, हिंग घालून फोडणी करा आणि ती या मिश्रणावर घालून मिश्रण एकजीव करा. 

५. काचेची बरणी कोरडी करुन त्यामध्ये हे मिश्रण भरुन ठेवा आणि पुढचे २-३ दिवस रोज बरणी उघडून लोणचे वरखाली हलवत राहा. हे लोणचे ५ ते ६ महिने सहज टिकते. 

(Image : Google)
(Image : Google)

ओल्या हळदीचे फायदे 

१. ओल्या हळदीचा सर्वात मोठा गुण म्हणजे यातील गुणधम कर्करोगाशी लढण्याचं काम करतात. ओल्या हळ्दीत करक्यूमिनोइडस आणि वोलाटइल हे तेल कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखतं तसेच त्यांना नष्टही करतं.

२. ओली हळद इन्शुलिनची पातळी संतुलित ठेवते. इन्शुलिन व्यतिरिक्त ओली हळद ग्लूकोजचं प्रमाणही नियंत्रित करते. त्यामुळे डायबिटीसच्या रुग्णांनी हे लोणचं अवश्य खावं. 

३.  हळदीमधे लिपोपायलिसॅराइड नावाचा घटक असतो. हा घटक शरीरातील रोगप्रितकारशक्ती वाढवण्यास आणि शरीराचे घातक जिवाणुंचा रक्षण करण्यास उपयुक्त असतो. 

४. ओल्या हळदीचं सेवन केल्यानं लिव्हरचं काम सुधारतं हे विविध अभ्यास आणि संशोधनांनी सिध्द केलं आहे.

५. त्वचेच्या किंवा इतर तक्रारींसाठी हळद उपयुक्त असते. त्यामुळे सोरायसिससारखे आजार बरे होण्यास त्याचा चांगला उपयोग होतो. तसेच हाडांच्या दुखण्यावरही ही हळद खाल्ल्यास त्रास कमी होण्याची शक्यता असते. 

Web Title: Raw Turmeric Pickle Recipe and Benefits : Winter special Done Raw turmeric pickle? A traditional recipe that adds color to food, 5 benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.