Join us

फक्त १ कप रव्याचा करा जाळीदार रवा ढोकळा; मऊ, स्पॉन्जी ढोकळा-सोपी रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 13:37 IST

Rawa Dhokla Recipe : रवा ढोकळ्याची ही रेसिपी बनवणं खूपच सोपं आहे. हा ढोकळा तुम्ही मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये देऊ शकता.

ढोकळ्याचं नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं (Rawa Dhokla Recipe) . ढोकळा चवीला फारच उत्तम आणि चवदार असतो. बेसनाचा वापर करून ढोकळा बनवला जातो. पण तुम्ही रव्याचा ढोकळासुद्धा बनवू शकता. रव्याचा ढोकळा पचायला हलका असतो. (How To Make Rawa Dhokla In Easy Way)

गुजराती स्टाईलमध्ये बनवला जाणारा हा ढोकळा खाल्ल्यानंतर बराचवेळ पोट भरलेलं राहतं. रव्याचा ढोकळा स्नॅक्स किंवा ब्रेकफास्टच्या स्वरूपात खाऊ शकता. रवा ढोकळ्याची ही रेसिपी बनवणं खूपच सोपं आहे. हा ढोकळा तुम्ही मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये देऊ शकता. रवा ढोकळा करण्याची सोपी रेसिपी पाहूया.

रवा ढोकळा करण्यासाठी लागणारं साहित्य

१) रवा- १ कप

२) दही- १ कप

३) बेकिंग सोडा- १ टिस्पून

४) तेल- गरजेनुसार

५) पाणी- १ तृतीयांश

६) मीठ- चवीनुसार

फोडणीसाठी लागणारं साहित्य

१) मोहोरी- अर्धा टिस्पून

२) तीळ- अर्धा टिस्पून

३)  जीरं- अर्धा टिस्पून

४) हिरवी मिरची- १

५) कढीपत्ते- ८ ते १०

६) चिरलेली कोथिंबीर- १ टेबलस्पून

७) तेल- १ टेबलस्पून

रवा ढोकळा करण्याची योग्य पद्धत

रवा ढोकळा करण्यासाठी सगळ्यात आधी एक वाटीत रवा घ्या. त्यात १ कप दही आणि १ तृतीयांश पाणी घालून व्यवस्थित एकत्र करून घ्या . नंतर चवीनुसार मीठ घालून मिश्रण फेटून घ्या. हे मिश्रण इतकं फेटा की या मिश्रणात गाठ राहणार नाही. त्यानंतर हे मिश्रण झाकून २० मिनिटांसाठी वेगळं ठेवून घ्या. यामुळे ढोकळा व्यवस्थित सेट होईल.

या मिश्रणात बेकिंग सोडा घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या. नंतर एक पसरट भांडं घेऊन त्याला तेल लावून घ्या. नंतर यात १ ते २ ग्लास पाणी घाला. नंतर भांड्याच्या स्टॅण्डवर ठेवा,   नंतर भांडं हाय फ्लेमवर ठेवून ढोकळा वाफेवर शिजू द्या.

 हळदी कुंकवासाठी घ्या २० रुपयांत आकर्षक वस्तू, पाहा पर्याय-वाण लुटा मनसोक्त

ढोकळा १० ते १५ मिनिटांत व्यवस्थित बनून तयार होईल. १० मिनिटांनंतर ढोकळा चाकू घालून तपासून घ्या.  जर चाकूला ढोकळ्याचं पीठ चिकटत असेल तर ५ मिनिटं अजून शिजवा. नंतर गॅस बंद करा. ढोकळा कोणत्याही भांड्यात काढून घ्या. ढोकळा थंड झाल्यानंतर चारही बाजूंनी चिरून घ्या.

केस पिकलेत? काळ्या बियांचा १ उपाय करा, सतत डाय करावं लागणार नाही-काळेभोर होतील केस

एका छोट्या पॅनमध्ये तेल घालून गरम करून घ्या. त्यात  राई, जीरं घालून फोडणी घाला. राई जेव्हा फुटू लागेल तेव्हा तीळ, हिरवी मिरची, कडीपत्ता घालून काही सेकंद भाजून घ्या नंतर गॅस बंद करा. नंतर तयार तडका रवा ढोकळ्यावर घाला नंतर हिरवी धण्याची पानं घालू गार्निश करा. रव्याचा ढोकळा तयार आहे. हा ढोकळा तुम्ही हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकता.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स