Join us

एकदम सॉफ्ट-स्पाँजी ताकातला ढोकळा घरी करा; १ सिक्रेट पदार्थ घाला, परफेक्ट पांढरा ढोकळा खा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 12:52 IST

Rawa Dhokla Recipe Semolina Dhokla (Rawa Dhokla Kasa banvava) : आंबवणं, भिजवणं अशी कोणतीही मोठी प्रक्रिया या ढोकळ्यासाठी करावी लागत नाही. रवा ढोकळा बनवण्याची एकदम सोपी रेसिपी पाहूया.

(Image Credit- Parenting first cry)

रवा ढोकळा नाश्त्यासाठी एक उत्तम, चटपटीत पदार्थ आहे. कमी वेळात आणि कमी तेलात हा ढोकळा झटपट बनून तयार होते. नाश्त्यासाठी तुम्ही तेच ते पदार्थ खाऊन बोअर झाला असाल की काहीतरी नवीन खाण्याची इच्छा होत असेल तर तुम्ही घरच्याघरी रव्याचा पांढराशुभ्र मऊ ढोकळा बनवू शकता. (Instant sooji dhokla recipe) हा ढोकळा बनवणं फारच सोपं आहे. आंबवणं, भिजवणं अशी कोणतीही मोठी प्रक्रिया या ढोकळ्यासाठी करावी लागत नाही. रवा ढोकळा बनवण्याची एकदम सोपी रेसिपी पाहूया. (Instant Rawa Dhokla Recipe)

ताकातला ढोकळा/ पांढरा ढोकळा करण्याची कृती (How to Make Rawa Dhokla)

१) बाऊलमध्ये १ कप बारीक रवा घ्या.  यात २ चमचे पोह्यांची पावडर घाला. यात कपभर दही घाला, दही थोडं आंबट असेल तर ढोकळ्याला चव चांगली येईल. दही नसेल तर तुम्ही यात ताकही घालू शकता. त्यात अर्धा टिस्पून आलं आणि मिरची पेस्ट, मीठ घाला. २ टिस्पून तेल घाला यामुळे ढोकळा मऊ होतो, १ टिस्पून साखर घाला. 

२) जर तुम्हाला साखर आवडत नसेल तर ही स्टेप वगळू शकता. सर्व पदार्थ  एकजीव करून घ्या. इडलीच्या बॅटरप्रमाणे मिश्रण जाडसर होईपर्यंत ढवळत राहा. नंतर २ चमचे पाणी घालून एकजीव करा आणि १० मिनिटांसाठी ढोकळ्याचे मिश्रण झाकून ठेवा. 

३) एका कढईत पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यात भांडी ठेवण्याचा स्टॅण्ड ठेवा. एक भाताचं टोप किंवा ढोकळ्याचे पात्र तेल लावून व्यवस्थित ग्रीस करून घ्या. १० मिनिटांनी जर  पीठ जास्त  घट्ट झालं असेल तर त्यात पाणी घालून मिसळा. त्यात इनो घालून पुन्हा मिसळून घ्या.

विकतसारखी घट्ट आलं-लसूण पेस्ट घरी करण्याची सोपी पद्धत; १ वर्ष टिकेल-सुगंधही उडणार नाही

४) तेल लावून व्यवस्थित ग्रीस केल्यानंतर डब्यात ढोकळ्याचे मिश्रण भरा नंतर झाकण ठेवून ढोकळा १० ते १५ मिनिटांसाठी वाफवून घ्या.  १५ मिनिटांनी गॅस बंद करून  ढोकळ्याचं भांडं बाजूला काढून घ्या.

दुधावर पराठ्यासारखी घट्ट साय येईल; दूध गरम करताना ५ ट्रिक्स वापरा-दुधावर जाड मलई येईल

५) एका फोडणी पात्रात तेल घालून २ मोठे चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर मोहोरी, तीळ आणि हिरव्या मिरच्या घाला. तुम्ही यात पाणी आणि साखरही घालू शकता. तयार ढोकळा सुरीच्या साहाय्याने काढून एका ताटात ठेवा. त्यावर फोडणी घालून  चौकोनी काप करून घ्या. तयार आहे गरमा गरम रवा ढोकळा. हा ढोकळा तुम्ही हिरवी चटणी, खोबऱ्याची चटणी किंवा सॉसबरोबर खाऊ शकता. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सहेल्थ टिप्स