Join us  

वाटीभर रव्यात होतील १५ इडल्या, सॉफ्ट आणि हलक्या- करा रवा इडलीचा इंस्टंट बेत, रेसिपी सोपी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 11:58 PM

Rawa Idli Recipe : सॉफ्ट चविष्ट रवा इडली करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळही लागणार नाही. (Cooking Tips and Tricks) 

इडली किंवा डोसा करायचं म्हणलं की आधी पीठ आंबवायचं, दळायचं अशी बरीच कामं असतात.  रोज रोज बाहेरून नाश्ता आणणं प्रत्येकालाच शक्य होतं असं नाही. (Rawa Idli Recipe) पण घरी इडली डोसे बनवायला बराच वेळ जातो. झटपट चविष्ट इडली बनवण्यासाठी तुम्हाला फक्त मोजकं साहित्य लागेल. सॉफ्ट चविष्ट रवा इडली करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळही लागणार नाही. (Cooking Tips and Tricks) 

रवा इडली बनवण्याची रेसेपी

रवा  - २५० ग्रॅम किंवा १ १/२ कप

दही - 300 ग्रॅम किंवा 1 1/2 कप

पाणी - 50 ग्रॅम किंवा 1/4 कप

मीठ - चवीनुसार किंवा 3/4 टीस्पून

एनो, मीठ - 3/4 टीस्पून

तेल - एक टेबलस्पून

कृती

१) सर्व प्रथम दही फेटून घ्या. आता एका भांड्यात रवा घेऊन त्यात दही घालून मिक्स करा. त्यात पाणी आणि मीठ घालून फेटून घ्या. आता मिश्रण 20 मिनिटे ठेवा. 20 मिनिटांनंतर मिश्रणात सोडा घाला आणि चांगले मिसळा. मिश्रण जास्त घट्ट नसावं आणि फार पातळ नसावे.

२) कुकरमध्ये २ छोटे ग्लास पाणी टाकून गॅसवर ठेवा, पाणी गरम होऊ द्या. इडली स्टँडला थोडं तेल लावून ग्रीस करा. इडलीच्या प्रत्येक भागात चमच्याने मिश्रण भरा. हे भांडं एकावेळी 12 किंवा 18 इडल्या बनवते. हे इडली स्टँडच्या आकारावर अवलंबून असते. कुकरमध्ये इडली स्टँड ठेवा आणि झाकण लावा, पण झाकणाची शिटी काढा. इडली 8 किंवा 10 मिनिटांत शिजते.

३) कुकरचे झाकण उघडा (इडली शिजली आहे की नाही हे पाहा) आणि प्लेटमध्ये ठेवा. तयार आहे गरमागरम रवा इडली या इडल्या तुम्ही सांभार किंवा चटणीबरोबर खाऊ शकता. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स