Join us

अमृतापेक्षा कमी नाहीत शेवग्याची फुलं, अनेक आजार जवळपासही येणार नाहीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 12:06 IST

Moringa Flower Benefits: आयुर्वेदातही या फुलांना महत्वाचं स्थान आहे. शेवग्याच्या फुलांमुळे आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर होतात. त्याच आज जाणून घेऊ.

Moringa Flower Benefits:  शेवग्याच्या शेंगा भरपूर लोक आवडीनं खातात. यांची चव चांगली लागते. पण अनेकांना हे माहीत नसतं की, केवळ शेवग्याच्या शेंगाच काय तर शेवग्याची फुलंही टेस्टी लागतात आणि आरोग्यासाठीही फायदेशीर होतात. शेवग्याच्या शेंगांमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट, व्हिटॅमिन्स आणि भरपूर मिनरल्स असतात. ही फुलं शरीराला भरपूर एनर्जी देतात. आयुर्वेदातही या फुलांना महत्वाचं स्थान आहे. शेवग्याच्या फुलांमुळे आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर होतात. त्याच आज जाणून घेऊ.

आयुर्वेदेताही शेवग्याच्या फुलांना फार महत्व आहे. शेंगा आणि पानं तर महत्वाची असतातच, सोबतच शारीरिक आणि मानसिक समस्या होतात. शेवग्याच्या शेंगांमुळे सूज कमी होते, हाडं मजबूत होतात आणि पचन तंत्र मजबूत होतं. सोबतच ब्लड शुगरही नियंत्रणात राहते.

एक्सपर्ट सांगतात की, शेवग्याच्या फुलांची भाजी खाल्ल्यानं शरीरातील रक्त शुद्ध होतं. शरीरातील विषारी तत्व बाहेर पडतात. ज्यामुळे त्वचा आणखी चांगली दिसते. यासाठी फुलांचं सूप पिऊ शकता, भाजी खाऊ शकता आणि चहामध्येही टाकू शकता.शेवग्याची फुलं काविळसारखा आजार दूर करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.

तसेच शेवग्याच्या पानांचं सूप प्यायल्यास मांसपेशी आणि हाडंही मजबूत होतात. यात प्रोटीन आणि इतर असे अनेक पोषक तत्व असतात जी हाडं आणि मांसपेशी मजबूत करतात. पण, शेवगा गरम असल्यानं उन्हाळ्यात यामुळे अॅसिडिटी, पाइल्स किंवा ब्लीडिंगसारखी समस्या होऊ शकते. 

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्स