Join us

ना मिक्सर, ना तेल; फक्त कपभर हिरव्या वाटाण्याची करा झणझणीत चटणी, चवीला भन्नाट - एकदा करून तर पाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2024 10:05 IST

Recipe: Easy-Peasy, Very Tasty - Green pea Chutney : हिरव्या वाटाण्याची करा झणझणीत चटणी; एकदा खाल तर भाजीच विसराल

जेवताना तोंडी लावण्यासाठी आपण लोणचं, पापड किंवा चटणी ताटात घेतो (Chutney Recipe). चटणीमुळे जेवणाची रंगत वाढते. चटणी अनेक प्रकारची केली जाते (Cooking Tips). खोबरं, तीळ, पापड किंवा भाज्यांचीही चटणी आपण करतो. चटणीमुळे जिभेला एक नवीन चव मिळते. पण आपण कधी हिरव्या वाटाण्याची झणझणीत चटणी खाऊन पाहिली आहे का?

हिरव्या वाटाण्याची भाजी, आमटी किंवा पराठा आपण खाल्लाच असेल, पण एकदा हिरव्या वाटाण्याची चमचमीत चटणी करून पाहा (Food). कमी साहित्यात, ना मिक्सर - ना तेल, अगदी ५ मिनिटात ही चटणी तयार होते. जर घरात खिचडी किंवा आवडीची भाजी नसेल तर, चपाती भाकरीसोबत हिरव्या वाटाण्याची चटणी करून आपण खाऊ शकता(Recipe: Easy-Peasy, Very Tasty - Green pea Chutney).

हिरव्या वाटाण्याची चमचमीत चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य

हिरवे वाटाणे

लसूण

उपमा करताना रव्याच्या गुठळ्या होतात? १ भन्नाट ट्रिक; नाश्ता सेंटरला मिळतो तसा उपमा होईल भन्नाट

हिरवी मिरची

पाणी

कृती

सर्वात आधी तवा गरम करण्यासाठी ठेवा. त्यात एक कप पाणी ओता. पाणी गरम झाल्यानंतर त्यात एक कप हिरवे वाटाणे घालून पसरवा. नंतर त्यात ३ ते ४ हिरव्या मिरच्या, ४ ते ५ लसणाच्या पाकळ्या आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.

खिचडी - वडे खाऊन कंटाळलात? कपभर साबुदाण्याच्या करा खमंग खुसखुशीत पुऱ्या; उपवासासाठी बेस्ट

नंतर त्यावर झाकण ठेवा. गॅस मध्यम आचेवर ठेवा. वाफेवर मटार ५ मिनिटांसाठी शिजवून घ्या. मटार शिजले नसतील तर, आणखीन २ मिनिटांसाठी शिजवून घ्या. हिरवे वाटाणे शिजल्यानंतर मॅशरने सर्व साहित्य मॅश करून घ्या, आणि तयार चटणी एका प्लेटमध्ये काढून घ्या. अशा प्रकारे हिरव्या वाटाण्याची झणझणीत चटणी खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स