Join us  

Recipe from leftover chapati : उरलेल्या चपातीपासून करा कुरकुरीत, खमंग नाश्ता; ही घ्या सोपी रेसेपी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2022 4:03 PM

Recipe from leftover chapati : चपाती शिळी होते तेव्हा त्यात काही चांगले बॅक्टेरिया येतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

उरलेल्या चपातीचं काय करायचं हा प्रश्न घरोघरच्या महिलांना पडतो. काहीजण चहा चपाती खातात तर काहींना चपातीचा कुस्करून खायला आवडते. शिळ्या चपातीचे लहान लहान तुकडे करून तुम्ही गरमागरम, खमंग नाश्ता तयार करू शकता यासाठी तुम्हाला जास्त काही करावं लागणार नाही घऱात उपलब्ध असलेल्या  साहित्यापासून तुम्ही हे बनवू शकता. (How to make breakfast from leftover roti)

शिळी चपाती खाण्याचे फायदे

१) शिळी चपाती खाल्ल्याने साखर आणि बीपी नियंत्रणात राहते. चपाती दुधासोबत खाणे अधिक फायदेशीर आहे. 

२) चपाती शिळी होते तेव्हा त्यात काही चांगले बॅक्टेरिया येतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यासोबतच शिळ्या भाकरीमध्ये ग्लुकोजचे प्रमाणही कमी असते.

कढईत भाज्या करताना ३ ट्रिक्स वापरा; साधा स्वयंपाकही बनेल रुचकर, चवदार

३) शिळ्या चपातीत फायबर असते, त्यामुळे पोटाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते.  त्यामुळे अपचन, बद्धकोष्ठता, अॅसिडिटी यासारख्या समस्याही दूर राहतात.

४) शिळी चपाती खाल्ल्याने  शरीराचे तापमानही सामान्य राहते. दुधासोबत शिळी चपाती खाल्ल्यास शरीराचे तापमान नियंत्रणात राहते. एवढेच नाही तर उन्हाळ्यात शिळ्या चपात्या खाल्ल्या तर उष्माघाताचा धोकाही कमी होतो.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्नकिचन टिप्स