Join us  

मेथीचे थेपले आणि झणझणीत चटणी; करा हिवाळी ब्रेकफास्ट सेलिब्रेशन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2021 4:26 PM

Methi ke theple Recipe: सध्या पालेभाज्या भरपूर प्रमाणात आणि स्वस्त दरात उपलब्ध आहेत... कोवळ्या, लुसलुशीत पालेभाज्या पाहिल्या की मन ही प्रसन्न होतं.. म्हणूनच बाजारातून मेथीची एक फ्रेश जुडी आणा आणि मस्त गरमागरम मेथीचे थेपले (Food: How to make methi ke theple) बनवा..

ठळक मुद्देसकाळी नाश्त्यासाठीही करू शकता किंवा रात्री तुम्हाला वन डिश मिल हवं असेल, तरीही ही रेसिपी चांगली आहे.

थंडीचे दिवस म्हणजे बाजारात फळं, भाज्या आणि पालेभाज्या यांची रेलचेल. मुळा, बीट, गाजर, काकडी अशा रंगबेरंगी सॅलडसोबत हिरव्याकंच पालेभाज्याही भरपूर प्रमाणात मिळतात. पावसाळा किंवा उन्हाळा या दोन्ही ऋतुंपेक्षा हिवाळ्यात (winter special food) मिळणाऱ्या पालेभाज्या खूपच टवटवीत लुसलुशीत असतात. त्यामुळेच तर फळं असो, भाज्या असो किंवा पालेभाज्या असो.. भरपूर खाऊन पिऊन पचवून टाकायचा काळ म्हणजे हिवाळा... म्हणूनच तर ही एक हिवाळी स्पेशल रेसिपी (winter special recipe) करा..  सकाळी नाश्त्यासाठीही करू शकता किंवा रात्री तुम्हाला वन डिश मिल हवं असेल, तरीही ही रेसिपी चांगली आहे. नुसते मेथीचे थेपलेच (methi theple recipe in Marathi) नाही, तर या थेपल्यांची रंगत वाढविणारी झणझणीत चटणीही करून बघा.. घ्या ही एका स्वादिष्ट, चटपटीत रेसिपी... ही रेसिपी (instagram) इन्स्टाग्रामच्या Amma Ki Thaali या पेजवर शेअर करण्यात आली आहे. 

 

कसे करायचे मेथीचे थेपले?How to make methi ke theple ?- मेथीचे थेपले करण्यासाठी आपल्याला ५०० ग्रॅम गव्हाचे पीठ, १०० ग्रॅम दही, ५० ग्रॅम बेसन, १०० ग्रॅम मेथीची कोवळी पाने, १ टीस्पून आलं- लसूण पेस्ट, १ टीस्पून लाल तिखट, १ टीस्पून हळद, १ टीस्पून ओवा, चवीनुसार मीठ आणि थोडं तेल.- सगळ्यात आधी तर एका बाऊलमध्ये कणिक आणि बेसन पीठ घ्या. यामध्ये मेथीची पानं बारीक चिरून टाका.- त्यानंतर वरील सगळं साहित्य बाऊलमध्ये टाका आणि गरजेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्या.- खूप सैलसर पीठ भिजवू नका. थेपले करण्यासाठी थोडं घट्ट पीठ भिजवावं.

- पीठ मळल्यानंतर त्यावर तेलाचा हात फिरवा आणि १५ ते २० मिनिटांसाठी ते झाकून ठेवा.- १५ ते २० मिनिट झाकून ठेवल्यावर पीठ सेट होईल आणि सरसर थेपले लाटता येतील.- थेपले लाटण्यासाठी आता पीठाचा लिंबापेक्षा थोड्या मोठ्या आकाराचा गोळा घ्या. त्याला दोन्ही बाजूने कणिक लावा आणि गोलाकार थेपला लाटा.- तव्यावर आधी थोडं तेल किंवा तूप टाका आणि थेपला छान खरपून भाजून घ्या...

 

चटणी करण्याची रेसिपी How to make chutney ?- या थेपल्यांची खरी मजा या चटणीसोबतच आहे. त्यामुळे सॉस, लोणचे, दही यासोबत थेपले खाण्यापेक्षा चटणीसोबत खा.- चटणी करण्यासाठी आपल्याला दोन टीस्पून तेल, १ टीस्पून जीरे, १ बारीक चिरलेला कांदा, १ बारीक चिरलेला टोमॅटो, १ टीस्पून शेंगदाणे, ६ ते ७ लसूणाच्या पाकळ्या, २ हिरव्या मिरच्या, १ टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून हळद पावडर, चवीनुसार मीठ हे साहित्य लागणार आहे.- सगळ्यात आधी कढईत तेल टाका. 

- तेल टाकल्यानंतर त्यात जीरे टाकून फोडणी करून घ्या.- यानंतर वरचं सगळं साहित्य एकेक करून फोडणीत टाका आणि चांगलं परतून घ्या.- आता यात थोडं पाणी टाका चवीनुसार मीठ टाका.

क्रिस्पी क्रंची कुरकुरीत पालक; पालकाची मिळमिळीत भाजी आता विसरा..

- पाणी टाकून २ ते ३ मिनिट शिजवल्यावर गॅस बंद करा.- हे मिश्रण थंड झालं की मिक्सरमधून वाटून घ्या.- थेपल्यासोबत खाण्यासाठी स्पेशल झणझणीत चटणी झाली तयार.. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.