Lokmat Sakhi >Food > भेळ म्हणताच तोंडाला पाणी सुटते; खा प्रोटीन रिच मखाने भेळ! भेळ वही, टेस्ट नई

भेळ म्हणताच तोंडाला पाणी सुटते; खा प्रोटीन रिच मखाने भेळ! भेळ वही, टेस्ट नई

Food and recipe: भेळ हा पदार्थच असा आहे की बघताक्षणीच तोंडाला पाणी सुटतं... चटपटीत भेळ (yummy bhel) म्हणजे अनेक जणांचा वीक पॉईंट.. आता हाच भेळचा फॉर्म्युला मखानासोबत वापरा. करून बघा मखानाची (How to make makhana bhel) चटपटीत प्रोटीन रिच टेस्टी आणि यम्मी भेळ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 01:03 PM2021-12-08T13:03:46+5:302021-12-08T13:06:20+5:30

Food and recipe: भेळ हा पदार्थच असा आहे की बघताक्षणीच तोंडाला पाणी सुटतं... चटपटीत भेळ (yummy bhel) म्हणजे अनेक जणांचा वीक पॉईंट.. आता हाच भेळचा फॉर्म्युला मखानासोबत वापरा. करून बघा मखानाची (How to make makhana bhel) चटपटीत प्रोटीन रिच टेस्टी आणि यम्मी भेळ...

Recipe: How to make protein rich makhana bhel, healthy and tasty food for weight loss | भेळ म्हणताच तोंडाला पाणी सुटते; खा प्रोटीन रिच मखाने भेळ! भेळ वही, टेस्ट नई

भेळ म्हणताच तोंडाला पाणी सुटते; खा प्रोटीन रिच मखाने भेळ! भेळ वही, टेस्ट नई

Highlightsवेटलॉससाठी मखाना हा एक उत्तम पर्याय आहे.मखानामध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मांमुळे राेगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे मखाना इम्युनिटी बुस्टर म्हणून ओळखले जातात.

मुरमुरा, फरसाण, तिखट- मीठाचं योग्य जुळून आलेलं प्रमाण, चिंचेची चटणी, तिखट चटणी आणि त्यावर बारीक शेव व कोथिंबीरीची पेरणी... अशी मस्त सजवलेली भेळची डिश समोर आली तर खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. आठवड्यातून एकदा तरी भेळीवर मनसोक्त ताव मारणारे अनेक खवय्ये आहेत. आता याच भेळीला आरोग्यदायी मखानाची (makhana or fox nut) जोड द्या... आणि करा प्रोटीन रिच मखाना भेळ ( protein rich makhana bhel recipe in marathi).. रेसिपी एकदम सोपी आणि चटकन होणारी....

 

मखाना म्हणजे कमळाच्या बिया (lotus seed). इंग्रजीमध्ये मखान्याला फॉक्स नट (fox nut) म्हणून ओळखले जाते. ड्रायफ्रुट्स (dry fruits) मध्ये हा प्रकार येतो आणि तो जवळपास सगळ्याच ड्रायफ्रुट्सपेक्षा महागडा असतो. भारतात खूप आधीपासूनच मखानाचा आहारात समावेश करण्यात आला आहे. प्रोटिन, कार्बोहायड्रेट, मँग्नेशिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम, व्हिटॅमिन्स मखानामध्ये भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळेच मखाना खाणे अतिशय आरोग्यदायी मानले जाते. हृदयरोग, किडनीविकार दूर ठेवण्यासाठी तर मखाना खावाच पण मधुमेह असणाऱ्या रूग्णांसाठीही मखाना पौष्टिक मानला जातो. वेटलॉस (weight loss) करणाऱ्यांनी नक्कीच मखाना खावा. कमळाच्या बियांना उष्णता देऊन त्याच्या लाह्या बनवतात. मखाना भेळची ही मस्त रेसिपी Zayka Ka Tadka या इन्स्टाग्राम (instagram) पेजवर शेअर करण्यात आली आहे. सकाळचा नाश्ता किंवा टी टाईम ब्रेकफास्ट (tea time breakfast) यासाठी हा पदार्थ अतिशय उत्तम आहे.

मखाना भेळ करण्यासाठी लागणारे साहित्य 
मखाना, तूप, तिखट, मीठ, चाट मसाला, काकडी, कांदा, टोमॅटो, कैरी, गाजर, कोथिंबीर, पुदिना, चिंचेची गोड चटणी, लिंबू, डाळिंबाचे दाणे. 


कशी करायची मखाना भेळ
Recipe: How to make makhana bhel
- मखाना भेळ करण्यासाठी तर सगळ्यात आधी एका पॅनमध्ये दोन टेबलस्पून तूप टाका. तुप गरम झालं की त्यात मखाना टाका आणि ८ ते १० मिनिटे ते मंद आचेवर भाजून घ्या.
- मखाना भाजून झाले की गॅस बंद करा. त्यानंतर मखानामध्ये चवीनुसार तिखट, मीठ आणि थोडा चाट मसाला टाका.
- आता मखाना पुर्णपणे थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतरच त्यापासून भेळ बनवा. 
- साधारण अर्ध्या तासात मखाना थंड होतील. त्यानंतर ते एक बाऊलमध्ये काढा. 
- त्यात बारीक चिरलेली कैरी, गाजर, काकडी, कांदा, टोमॅटो हे सगळे साहित्य आवडीनुसार टाका. आवडत असल्यास यात तुम्ही कच्ची बारीक चिरलेली पत्ताकोबी, सिमला मिरची अशाही भाज्या टाकू शकतात.
- आवडीनुसार भाज्या टाकून झाल्या की त्यात कोथिंबीर आणि पुदिना यांची वाटून केलेली चटणी आणि थोडी चिंच- गुळाची चटणी टाका.
- यानंतर त्यात थोडे डाळिंबाचे दाणे टाका. डाळिंबाचे दाणे नसतील तरी चालेल.
- यानंतर वरतून थोडं लिंबू पिळा आणि सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून एकत्र करून घ्या.
- चटपटीत, प्रोटीन रिच मखाना भेळ झाली तयार. 

 

मखाना खाण्याचे आरोग्यदायी फायदे 
Benefits of eating Makhana

- मखानामध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मांमुळे राेगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे मखाना इम्युनिटी बुस्टर म्हणून ओळखले जातात.
- मखानामध्ये खूप जास्त प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स असतात.
- आजारी माणसाला मखाना निखमितपणे खायला दिल्यास अंगात ताकद येते.
- अशक्तपणा दूर करण्यासाठी मखाना अतिशय पौष्टिक आहे.
- वेटलॉससाठी मखाना हा एक उत्तम पर्याय आहे. कारण काही अभ्यासानुसार असे सांगण्यात आले आहे की मखानामध्ये असणारे काही घटक शरीरातील चरबी नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप उपयुक्त् ठरतात. त्यामुळे वजन घटवायचे आहे, त्यांनी नियमितपणे मखाना खावा.
- मखाना नियमित खाल्ल्यामुळे निद्रानाशाचा त्रास दूर होतो.
- अंगातील उष्णता वाढल्यास मखाना खावा.
- मखाना खाल्ल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.

 

Web Title: Recipe: How to make protein rich makhana bhel, healthy and tasty food for weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.