Join us  

प्रोटीन शेक घरच्याघरी तयार करण्याची कृती, बाजारातल्या प्रोटीन पावडरला उत्तम पर्याय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2021 1:15 PM

शरीराच्या मजबुतीसाठी योग्य प्रमाणात प्रोटीन मिळणे खूप गरजेचे आहे. प्रोटीन्सची कमतरता भरून काढण्यासाठी विकतचे महागडे प्रोटीन शेक घेता? मग तसे करण्याऐवजी घरीच पौष्टिक प्रोटीन शेक तयार करा..

ठळक मुद्दे दुधाऐवजी प्रोटीन शेकमध्ये सोया मिल्कचा वापरही करता येतो. सोयाबिनमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात. त्यामुळे त्याचा उपयोग अधिक गुणकारी ठरतो. 

काही दिवसांपुर्वीच प्रोटीन सप्ताह संपूर्ण देशभरात साजरा झाला. यामध्ये भारतीयांमध्ये असणारी प्रोटीन्सची कमतरता पुन्हा एकदा अधोरेखित झाली. शाकाहारी लोकांचा जो आहार असतो, त्याद्वारे त्यांना योग्य प्रमाणात प्रोटिन्स मिळत नाही. त्यांच्या शरीराला असणारी प्रोटिन्सची गरज त्यांच्या आहारातून भागविली जात नाही. त्यामुळे मग शरीराला प्रथिनांचा योग्य प्रमाणात पुरवठा व्हावा, यासाठी अनेक जण प्रोटीन शेक घेणे पसंत करतात. यासाठी बाजारात प्रोटीन शेकचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण बऱ्याचदा ते आपल्या खिशाला परवडतील, असे नसते. म्हणून घरीच प्रोटीन शेक तयार करा. अतिशय सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात घरच्याघरी उत्तम प्रोटीन शेक बनवता येतात. 

 

असा बनवा बदाम प्रोटीनशेक१. बदामांमध्ये प्रोटीन्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे सगळ्यात आधी तर बदाम प्रोटीन शेक बनविण्याची रेसिपी..- हा प्रोटीन शेक बनविण्यासाठी २५ बदाम, अडीच कप पाणी, अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस, चिमुटभर दालचिनी पूड, एक टेबलस्पून जवस लागणार आहेत. सगळ्यात आधी बदाम आणि सुके खोबरे रात्रभर पाण्यात भिजत घाला. सकाळी ते मिक्सरमधून फिरवून घ्या आणि त्याची बारीक पेस्ट करा. यानंतर यामध्ये दूध, थोडे पाणी आणि दालचिनी पावडर टाका. सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. पौष्टिक बदाम प्रोटीन शेक झाला तयार.- दुधाऐवजी या प्रोटीन शेकमध्ये सोया मिल्कचा वापरही करता येतो. सोयाबिनमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात. त्यामुळे त्याचा उपयोग अधिक गुणकारी ठरतो. 

 

२. डार्क चॉकलेट आणि केळीसाहित्य-१ केळी, १ कप दूध, १ टेबलस्पून बदाम पावडर, २ टेबलस्पून डार्क चॉकलेट.कसा करायचा प्रोटीन शेककेळाचे लहान- लहान तुकडे करा आणि त्यामध्ये डार्क चॉकलेट व बदाम पावडर टाका. हे मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्या. यामध्ये आता दूध टाका आणि पुन्हा एकदा मिक्सर मधून फिरवून घ्या. हे सगळं साहित्य ग्लासमध्ये ओतून घ्या. मिश्रण जर अधिक घट्ट वाटलं, तर त्यात थोडे दूध टाका. मस्त प्रोटीनशेक झाला तयार. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीपौष्टिक आहार