साधी खिचडी करा... गुजराती घोटीव खिचडी करा.. किंवा मग भाज्या घालून मसाला खिचडी करा... कशीही खिचडी केली तरी खिचडी लव्हर (khichadi lover) तिच्यावर भरभरून प्रेम करतात म्हणजे करतात... बरं सोबत तोंडी लावायला कढी, पापड, सार, लोणचं, चटणी, ठेचा, दही असं काहीही चालतं.. फक्त मनमोकळं करून ओतलेली तुपाची धार हवी... असं खिचडीवर मनापासून प्रेम करणाऱ्यांना रागीची म्हणजेच नाचणीची खिचडीही (recipe of ragi/ finger millet khichadi in marathi) नक्कीच आवडेल. शिवाय करायलाही अतिशय सोपी...
थंडीत रोगप्रतिकारक शक्ती (immunity booster food) वाढविण्यासाठी शरीर आतून उबदार रहावं यासाठी आपण डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू, सुकामेवा असे पदार्थ या दिवसांत आवर्जून खातो. तशाच पद्धतीचं अन्न म्हणजे थंडीत केली जाणारी नाचणीची खिचडी. हिवाळ्यात जर नाचणी खाल्ली तर त्याचे शरीराला अनेक फायदे होतात. नाचणीविषयी सांगताना आहारतज्ज्ञ म्हणततात की नाचणी हे एक ग्लुटेन फ्री धान्य आहे. त्यामुळे नाचणीची खिचडी खाऊन वजन वाढेल असं मुळीच नाही.
मेथीचे थेपले आणि झणझणीत चटणी; करा हिवाळी ब्रेकफास्ट सेलिब्रेशन !
म्हणूनच वेटलॉससाठी (weight loss) प्रयत्न करणाऱ्यांसाठीही हा पदार्थ अतिशय उपयुक्त आहे. शिवाय नाचणीमध्ये खूप जास्त कॅल्शियम (calcium) आणि ॲण्टीऑक्सिडंट्स (anti oxidants) असतात. त्यामुळे थंडीत होणारा संधीवाताचा त्रास किंवा जुनं हाडांचं उफाळून येणारं दुखणं कमी करायचं असेल, तर ही खिचडी नक्की खा. मधुमेह असणाऱ्यांसाठीही नाचणीची खिचडू चालू शकते. म्हणूनच तर एवढे सगळे फायदे देणारी नाचणीची खिचडी एकदा करून बघाच...
कशी करायची नाचणीची खिचडी?How to make ragi or nachani khichadi?- नाचणीची खिचडी करण्यासाठी आपल्याला १ कप तांदूळ, अर्धा कप मुगाची डाळ, अर्धा कप नाचणी, चवीनुसार तिखट किंवा एखादी हिरवी मिरची व मीठ, १ टीस्पून जीरे, अर्धा टिस्पून हळद, १ टीस्पून गरम मसाला आणि १ टेबलस्पून तुप लागणार आहे.- नाचणीची खिचडी करण्यासाठी डाळ, तांदूळ (moong dal and rice) आणि नाचणी १ तासासाठी पाण्यात भिजत ठेवा. - यानंतर कुकरमध्ये तूप टाका. तुप गरम झालं की त्यात जीरे टाका आणि फोडणी करून घ्या.
- फोडणी झाल्यानंतर त्यात हळद, हिरवी मिरची टाका. त्यानंतर त्यात भिजवलेले डाळ, तांदूळ आणि नाचणी टाका.- त्यानंतर त्यात चार ते पाच कप पाणी टाका. चवीनुसार मीठ आणि मसाला टाका आणि कुकरचं झाकण लावून टाका.- ३ ते ४ शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करा..- खिचडी ताटात वाढून घेतली की त्यावर तूप टाका आणि गरमागरम खिचडी खाण्याचा आनंद घ्या..