उन्हाळ्यात दही, ताक असे पदार्थ आवर्जून घेतले जातात. पण हिवाळ्यात मात्र दही (curd), ताक घेणे टाळले जाते. दही घेतल्याने हिवाळ्यात अनेक जणांना सर्दी, पडसे, शिंका येणे असा त्रास होऊ शकतो. पण ताक हे खूपच सौम्य असते. बऱ्याच जणांना हिवाळ्यात दही घेणे जसे बाधक ठरते, तसे ताकाच्या बाबतीत होत नाही. कारण ताकामध्ये दह्याची मात्रा खूप कमी आणि पाण्याची मात्रा जास्त असते. शिवाय हिवाळ्यात कधी आणि कसं ताक प्यावं, याच्याही काही पद्धती आहेत. या जर लक्षात घेतल्या तर हिवाळ्यातही मसालेदार ताक पिणं आरोग्यासाठी पोषक (Benefits of drinking masala buttermilk) ठरू शकतं.
हिवाळ्यात ताक पिताना अशी काळजी घ्या..
(Rules for drinking masala buttermilk in winter)
- हिवाळ्यात साधं ताक पिणं टाळा. त्याऐवजी मसाला ताक घ्या. कारण ताकातले मसाले तुम्हाला हिवाळ्यात होणाऱ्या अनेक आजारांपासून दूर ठेवतात.
- खूप सकाळी आणि सायंकाळ नंतर हिवाळ्यात ताक पिऊ नये.
- नाश्ता केल्यानंतर किंवा दुपारच्या जेवणात ताक घेणे फायदेशीर ठरते.
- ताक प्यायल्यानंतर गुळाचा खडा तोंडात टाका. ताकावर जर उष्ण गुळ घेतला तर थंडीचा त्रास होत नाही.
- मसाला ताक बनविताना त्यात जे अनेक मसाले टाकले जातात, त्याचा पचनशक्ती सुधारण्यासाठी आणि थंडीचा त्रास होऊ नये, यासाठी खूप चांगला उपयोग होतो. त्यामुळे हिवाळ्यात साध्या ताकाऐवजी मसाला ताक पिण्यास प्राधान्य द्या.
- हिवाळ्यात ताक करण्यासाठी खूप आंबट आणि जूने दही वापरू नका.
ताक पिण्याचे फायदे
(Benefits of drinking masala buttermilk)
- ताक नियमित प्यायल्यामुळे पचनशक्ती (digestion)आणि चयापचय (metabolism) क्रिया सुधारते. कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोबायोटीक असतात. त्यामुळे शरीरावर अतिरिक्त चरबी (fats) साचून राहत नाही.
- ताक प्यायल्याने शरीरातील रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारते आणि रक्ताभिसरण (blood circulation)उत्तम होते.
- वेटलॉससाठी (weight loss) ताक पिणे उपयुक्त ठरते. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांनी नियमितपणे दुपारच्या जेवणात ताक घ्यावे.
- ताकातून शरीराला प्रोटीन्स, कॅल्शियम मोठ्या प्रमाणात मिळते.
- ताकामध्ये व्हिटॅमिन सी (vitamin c)असते. त्यामुळे प्रतिकार शक्ती वाढते.
थंडी स्पेशल मसाला ताक रेसिपी
How to make winter special spicy buttermilk
साहित्य
अर्धा कप चिरलेली पुदिना पाने, अर्धा कप चिरलेली कोथिंबीर, अर्धा टीस्पून बारीक चिरलेली मिरची, २ टीस्पून जीरेपूड, १ टीस्पून काळे मीठ, २ कप दही, चवीनुसार मीठ
ताक तयार करण्याची रेसिपी
- पुदिन्याची पाने, कोथिंबीर, मिरच्या आणि अर्धा कप दही हे सगळे साहित्य मिक्सरमध्ये टाका आणि फिरवून घ्या.
- यानंतर हे मिश्रण एका बाऊलमध्ये काढा. त्यात जीरेपूड, काळेमीठ टाका.
- उरलेले दही या मिश्रणात टाका आणि अडीच ते तीन कप पाणी घाला.
- हे मिश्रण व्यवस्थित घुसळून घ्या. त्यात चवीनुसार मीठ टाका.
- आता हे मसाला ताक पिण्यासाठी तयार आहे.