Join us  

२०२१ मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च झालेली 'ही' रेसिपी तुम्ही करुन पाहिली की नाही अजून?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2021 7:23 PM

ही आहे २०२१ मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च झालेली रेसिपी (most searched recipe on the google).. गुगलला विचारुन तुम्हीपण हा पदार्थ बनवला होता का?

ठळक मुद्देम्हणूनच तर आता बघूया की एवढ्या सगळ्या लोकांनी गुगलला विचारलेला हा बनाना ब्रेड नेमका आहे तरी काय आणि तो बनवायचा कसा...

लॉकडाऊन (lockdown) दरम्यान हॉटेल्स बंद झाले आणि मग घरोघरी वेगवेगळे खाद्यपदार्थ बनविण्याचे (food and cooking) प्रयोग सुरू झाले.. सोशल मिडियामुळे (social media) तर या प्रयोगांना भलतेच खतपाणी मिळाले... पदार्थ बनविणे आणि त्याचा आस्वाद घेणे, या दोन्ही गोष्टींसाठी भरपूर वेळ मिळत होता. त्यामुळे मग खवय्ये आणि पदार्थ बनवून खाऊ घालणारे (banana bread recipe in Marathi) अशा दोन्ही टिममधल्या मेंमबर्सचा उत्साह शिगेला पोहोचलेला होता. याच उत्साहाच्या भरात आजवर जे पदार्थ कधीही घरी बनवले गेले नाहीत, ते पदार्थही घरातल्या घरात तयार होऊ लागले.. अगदी पावभाजी, मिसळपाव साठी लागणारे पाव, ब्रेड (bread) देखील घरीच बनवले गेले.. 

 

म्हणूनच तर २०२१ मध्ये जे प्रश्न गुगलवर सर्वाधिक सर्च केले गेले, त्यामध्ये सातव्या क्रमांकावर एक रेसिपी आहे. ही रेसिपी आहे बनाना ब्रेडची (most searched recipe on google is banana bread). २०२१ मध्ये गुगलवर सर्वाधिक (google trends) शोधल्या गेलेल्या २० प्रश्नांची यादी गुगलने नुकतीच प्रकाशित केली आहे. ही यादी दोन भागांत विभागली आहे. पहिल्या भागात व्हॉट (what) पासून सुरू होणारे १० प्रश्न दिलेले आहेत. तर दुसऱ्या भागात हाऊ (how) या शब्दापासून सुरू होणारे १० प्रश्न दिलेले आहेत. यापैकी हाऊ च्या यादीत हाऊ टू मेक बनाना ब्रेड हा प्रश्न सातव्या स्थानावर आहे. रेसिपीशी संबंधित हा एकच प्रश्न या दोन्ही याद्यांमध्ये आहे. त्यामुळेच तर बनाना ब्रेड ची रेसिपी २०२१ मध्ये सर्वाधिक हीट झाल्याचे दिसून येते...

 

मध्यंतरी आपल्याही बऱ्याच मैत्रिणींनी घरच्याघरी वेगवेगळे केक, ब्रेड, पिझ्झा बेस, पाव बनविले होते.. त्यामुळे आपणही हा प्रश्न गुगलला विचारलेला असू शकतो बरं का... म्हणूनच तर आता बघूया की एवढ्या सगळ्या लोकांनी गुगलला विचारलेला हा बनाना ब्रेड नेमका आहे तरी काय आणि तो बनवायचा कसा... हा ब्रेड बनविण्यासाठी ओव्हनची गरज नाही. कुकरमध्येही आपण बनाना ब्रेड बनवू शकतो. ही रेसिपी Terrace Kitchen या यु ट्यूब पेजवर देण्यात आली आहे. (banana bread recipe in Marathi)

 

बनाना ब्रेड रेसिपी बनविण्यासाठी लागणारं साहित्यingredients for banana bread २ पिकलेली केळी, अर्धा कप दूध, ४ टेबलस्पून तेल, २ टेबलस्पून वितळलेलं तूप, ३/४ कप पिठीसाखर, दीड कप मैदा, १ टीस्पून बेकींग पावडर, अर्धा टीस्पून बेकींग सोडा, अर्धा कप अक्रोड किंवा तुमच्या आवडीच्या सुकामेव्याचे तुकडे.

तांदळाची खिचडी नेहमीचीच.. गरमागरम चवदार रागी खिचडी करा, हिवाळ्यातलं स्पेशल फूड..

कसा करायचा बनाना ब्रेड?How to make banana bread?- बनाना ब्रेड बनविण्यासाठी सगळ्यात आधी कुकरची शिट्टी काढा, त्यात एक वाटी मीठ टाका. कुकरमध्ये एक स्टॅण्ड ठेवा. झाकण लावून कुकर २० मिनिटांसाठी मध्यम आचेवर प्री हीटला ठेवून द्या.- दूध आणि केळी मिक्सरमधून बारीक करून घ्या. यानंतर दूध, तेल, तूप हे साहित्य एकत्र करा. त्यात पिठीसाखर, मैदा, बेकींग सोडा, बेकींग पावडर हे सगळे साहित्य एकत्र करून व्यवस्थित चाळून घेऊन टाका. नंतर सुकामेवा टाका.

- त्यानंतर सगळे मिश्रण स्टॅपूलाने हलवून एकत्र कालवून घ्या. कुठेही पिठाचे गोळे राहणार नाहीत याची काळजी घ्या.- यानंतर ब्रेड मेकींग स्टॅण्डला तूपाचा हात फिरवून घ्या. त्यामध्ये हे पीठ टाका.- प्री हीट साठी ठेवलेल्या कुकरमध्ये हे स्टॅण्ड ठेवून द्या. २५ ते ३० मिनिटे मध्यम आचेवर आणि त्यानंतर १० मिनिटे कमी गॅसवर ब्रेड बेक होऊ द्या.- त्यानंतर गॅस बंद करा.- ब्रेड थंड झाला की त्याच्या स्लाईसेस करा.. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.गुगल