Lokmat Sakhi >Food > वर्षभर प्या गारेगार आंबटगोड पन्हं! अस्सल मराठी चवीचं कैरी ‘पन्हं प्रिमिक्स’ करा १० मिनिटांत...

वर्षभर प्या गारेगार आंबटगोड पन्हं! अस्सल मराठी चवीचं कैरी ‘पन्हं प्रिमिक्स’ करा १० मिनिटांत...

Kachhi Kairiche Panha Primix : recipe of aam panna premix powder : aam panna premix powder : कैरी पन्हं प्रिमिक्स घरच्याघरीच तयार करण्याची रेसिपी पाहूयात....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2025 15:00 IST2025-04-09T14:42:59+5:302025-04-09T15:00:57+5:30

Kachhi Kairiche Panha Primix : recipe of aam panna premix powder : aam panna premix powder : कैरी पन्हं प्रिमिक्स घरच्याघरीच तयार करण्याची रेसिपी पाहूयात....

recipe of aam panna premix powder aam panna premix powder Kachhi Kairiche Panha Primix | वर्षभर प्या गारेगार आंबटगोड पन्हं! अस्सल मराठी चवीचं कैरी ‘पन्हं प्रिमिक्स’ करा १० मिनिटांत...

वर्षभर प्या गारेगार आंबटगोड पन्हं! अस्सल मराठी चवीचं कैरी ‘पन्हं प्रिमिक्स’ करा १० मिनिटांत...

उन्हाळयात आपल्याला सारखं काहीतरी थंडगार प्यायची इच्छा होतेच. अशावेळी आपण कोल्ड्रिंक्स, लिंबूपाणी, कोकम सरबत, ताक अशी वेगवेगळ्या प्रकारची पेय पिणे (Kachhi Kairiche Panha Primix) पसंत करतो. उन्हाळ्यातील या इतर प्रकारच्या सरबतांसोबतच कैरीचं आंबट - गोड पन्हं देखील मोठ्या आवडीने प्यायले जाते. एरवी वर्षभर कैरी मिळत नसल्याने उन्हळ्यात (recipe of aam panna premix powder) हमखास घरोघरी कैरीचे पन्हं (aam panna premix powder) तयार केलं जातच.

कैरीचा सिझन हा फक्त उन्हाळ्यातच असल्याने आपण कैरीचे पन्हं फक्त याच सीझनमध्ये पितो. परंतु जर आपण उन्हाळ्यात विकत मिळणाऱ्या कैरी पन्ह्याचे प्रिमिक्स एकदाच करुन ठेवले तर आपण वर्षभर कैरीचे पन्हं पिऊ शकतो. उन्हाळ्यात बाजारांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर हिरव्यागार कैऱ्या विकायला ठेवलेल्या असतात. या हिरव्यागार कैऱ्या विकत आणून आपण वर्षभरासाठी त्याचे प्रिमिक्स तयार करून ठेवू शकतो. यामुळे आपण आंबट - गोड कैरीच्या पन्ह्याचा आस्वाद वर्षभरात कधीही घेऊ शकतो. यासाठी कैरी पन्हं प्रिमिक्स घरच्या घरीच तयार करण्याची सोपी रेसिपी पाहूयात.

साहित्य :- 

१. कैरी - २ (मध्यम आकाराच्या कच्च्या कैऱ्या)
२. हिरव्या मिरच्या - २ मिरच्या 
३. आलं - १ छोटा तुकडा 
४. जिरेपूड - १ टेबलस्पून 
५. काळीमिरी पूड - १/४ टेबलस्पून 
६. पुदिन्याची पाने / पावडर - १ टेबलस्पून
७. लिंबाचा रस - १ टेबलस्पून 
८. साखर - १ कप 

आई काहीतरी भारी कर, असं मुलं म्हणतात ना? मग करा १० मिनिटांत चाॅकलेट आप्पे - सुट्टी स्पेशल रेसिपी...


मसाला ताक प्या कुठेही-कधीही! ही घ्या इन्स्टंट मसाला ताक क्यूब रेसिपी, पोटाला थंडावा रोज...

कृती :- 

१. सगळ्यात आधी कैऱ्या स्वच्छ धुवून त्या कुकरला लावून २ शिट्ट्या करून व्यवस्थित उकडवून घ्याव्यात. 
२. त्यानंतर या कैऱ्यांची सालं काढून त्यातील गर काढून घ्यावा. उकडवून घेतलेल्या कैऱ्यांचा गर मिक्सरच्या भांड्यात ओतून घ्यावा. 
३. आता यात बारीक तुकडे केलेल्या हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा, जिरेपूड, काळीमिरी पूड, पुदिन्याची पाने किंवा पावडर देखील घालू शकता. सगळ्यात शेवटी लिंबाचा रस घालावा. 
४. हे सगळे जिन्नस एकत्रितपणे मिक्सरच्या भांड्यात वाटून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. 
५. तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून त्यात साखर घालावी. मग चमच्याने हलवून साखर संपूर्णपणे विरघळवून घ्यावी. 

शहाळ्यात पाणी जास्त आहे की मलई ? कसे ओळखाल - ६ टिप्स - अचूक निवड करणे झाले सोपे...

६. साखर संपूर्णपणे विरघळल्यानंतर हे तयार मिश्रण एका पसरट ताटात ओतून घ्यावे. त्यानंतर ३ ते ४ दिवस उन्हांत वाळवून घ्यावे. 
७. ताटातील मिश्रण संपूर्णपणे सुकेपर्यंत वाळवून घ्यावे. मिश्रण पूर्णपणे वाळल्यानंतर ते चमचा किंवा सुरीच्या मदतीने खरवडून काढावे. 
८. आता हे तयार मिश्रण मिक्सरमध्ये वाटून त्याची पावडर तयार करून घ्यावी. 

कैरीच्या पन्ह्याचे प्रिमिक्स तयार आहे. हे तयार प्रिमिक्स आपण एका एअर टाईट कंटेनरमध्ये भरुन वर्षभरासाठी स्टोअर करुन ठेवू शकतो. फ्रिजमध्ये न ठेवता  देखील हे प्रिमिक्स वर्षभर चांगले टिकते. जेव्हा आपल्याला पन्हं प्यायचे असेल तेव्हा पाण्यांत चमचाभर प्रिमिक्स घालून इन्स्टंट कैरी पन्हं तयार करावे.

Web Title: recipe of aam panna premix powder aam panna premix powder Kachhi Kairiche Panha Primix

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.