Lokmat Sakhi >Food > पदार्थ वारंवार गरम करताय ? WHO सांगते, शिजवलेले अन्न पुन्हा पुन्हा गरम केले तर...

पदार्थ वारंवार गरम करताय ? WHO सांगते, शिजवलेले अन्न पुन्हा पुन्हा गरम केले तर...

What are the rules for correctly reheating food : Reheat your food properly before eating’, says WHO : एकदा शिजवलेले अन्नपदार्थ पुन्हा गरम करण्याची योग्य पद्धत पाहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2024 09:00 AM2024-06-20T09:00:00+5:302024-06-20T09:00:02+5:30

What are the rules for correctly reheating food : Reheat your food properly before eating’, says WHO : एकदा शिजवलेले अन्नपदार्थ पुन्हा गरम करण्याची योग्य पद्धत पाहा.

Reheat your food properly before eating’, says WHO Proper Reheating Food Techniques | पदार्थ वारंवार गरम करताय ? WHO सांगते, शिजवलेले अन्न पुन्हा पुन्हा गरम केले तर...

पदार्थ वारंवार गरम करताय ? WHO सांगते, शिजवलेले अन्न पुन्हा पुन्हा गरम केले तर...

भारतीय परंपरेत अन्नाला पूर्णब्रह्म मानले जाते. त्यानुसारच आपण जेवणाच्या ताटातील सगळेच अन्नपदार्थ संपवतो, अन्न पदार्थ पानांत फेकून फेकून देत नाही. काही घरांमध्ये उरलेले अन्नपदार्थ फेकून न देता ते तसेच ठेवले जातात व दुसऱ्या दिवशी गरम करुन खाल्ले जातात. बरेचदा जास्तीचे अन्नपदार्थ बनवले जातात आणि ते उरल्यावर फ्रिजमध्ये ठेवले जातात. यानंतर फ्रिजमध्ये ठेवलेले पदार्थ पुढील काही दिवस वारंवार फ्रिजमधून काढून गरम करून खाल्ले जातात. त्याचबरोबर, काहीजणांना गार झालेले अन्नपदार्थ खायला आवडत नाही, अशावेळी तो पदार्थ वारंवार गरम करुन खाल्ला जातो. परंतु अन्नपदार्थ सारखे गरम करुन खाणे हे आपल्या आरोग्यास अपायकारक ठरु शकतात(Proper Reheating Food Techniques).

WHO च्या मते, जर आपण एकदा शिजवलेले अन्नपदार्थ लगेच खाल्ले नाहीत, तर ते परत गरम करुन खाणे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असते. परंतु जर आपण हे पदार्थ एका विशिष्ठ पद्धतीने रिहिट केले तर ते खाण्यासाठी योग्य असतात. जर आपल्याला देखील अन्नपदार्थ वारंवार गरम करुन खाण्याची सवय असेल तर नेमकं कोणत्या पद्धतीने गरम करावे, हे समजून घेऊयात. WHO ने सांगितलेल्या, पद्धतीने जेवण परत गरम केले तरच ते खाण्यायोग्य व आरोग्याला अपायकारक ठरत नाही(according to WHO rule to reheat food properly for safe & healthy eating).

अन्नपदार्थ वारंवार गरम केल्याने काय होते ? 

अन्नपदार्थ एकापेक्षा जास्त वेळा गरम केल्यास ते नीट पचत नाही. विशेषत: प्रथिनयुक्त पदार्थ पुन्हा गरम केल्याने प्रथिनांच्या संरचनेत बदल होतो. ज्याला 'प्रोटीन डिनेच्युरेशन' म्हणतात. या प्रक्रियेनंतर अन्नपदार्थातील पोषक घटकांचे प्रमाणही कमी होते. तांदूळ, पास्ता यांसारखे पदार्थ शिजवल्यानंतर काही वेळाने त्यात बॅक्टेरिया वाढू लागतात. हे बॅक्टेरिया अन्नपदार्थ पुन्हा गरम केल्यावर नष्ट होत नाहीत याउलट वाढतात जे आरोग्यासाठी हानिकारक असते. बटाटे किंवा ब्रेडपासून बनवलेले कोणतेही खाद्यपदार्थ पुन्हा गरम केल्यास ऍक्रिलामाइड तयार होते. यामुळे कर्करोग होण्याचा धोका वाढतो. तेलात तळलेली भजी किंवा पुरी हे पदार्थ वारंवार गरम केल्यास त्यांचा पोत, चव आणि कुरकुरीतपणा नाहीसा होतो.

टोस्टर वापरूनही करता येईल तंदुरी रोटी, बघा भन्नाट ट्रिक - घरीच करा हॉटेलसारखी तंदूरी रोटी... 

WHO च्या मते, अन्नपदार्थ परत कसे गरम करावे ? 

WHO च्या मते, कोणतेही अन्नपदार्थ किमान ७० डिग्री सेल्सिअस तापमानात पुन्हा गरम केले जाऊ शकतात. असे केल्याने त्यात वाढणारे बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते. परंतु ही प्रक्रिया एकदाच केली पाहिजे, कारण वारंवार गरम केल्याने अन्नाचा दर्जा आणि त्याच्या सुरक्षितता कमी होऊ शकते. 

फणस कापण्याचा व्याप मोठा, हात-सुरी चिकट होते? ३ सोप्या टिप्स- फणस खा- कापा-बरंका..

WHO च्या मते, अन्नपदार्थ गरम करण्याची योग्य पद्धत कोणती ? 

जेव्हा अन्नपदार्थ पुन्हा गरम केले जाते तेव्हा त्यातील काही घटक सुकतात. म्हणून, ते गरम करण्यापूर्वी, आपण त्यात द्रव पदार्थ जसे की पाणी, सॉस घालू  शकता. असे केल्याने अन्नपदार्थांची चव टिकून राहते. 

एकाच वेळी अन्नपदार्थ पूर्णपणे गरम करणे टाळावे. जर आपण ते वारंवार मोठ्या प्रमाणात गरम केले तर त्याची गुणवत्ता कमी होऊ शकते. त्यामुळे जेवढे अन्न हवे तेवढे वेगळे काढून मगच गरम करावे.

मायक्रोवेव्हमध्ये शिजवलेले अन्न पुन्हा गरम करण्यासाठी, ते झाकणाने झाकणे महत्वाचे आहे. टाइमर सेट करा आणि अधूनमधून ढवळत राहा. त्याचे तापमान १६५ अंशांपर्यंत पोहोचेपर्यंत अन्न गरम केले पाहिजे.

Web Title: Reheat your food properly before eating’, says WHO Proper Reheating Food Techniques

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.